esakal | सतरा दिवसांत 10423 जणांची कोरोनावर मात ! आज 1389 रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

सतरा दिवसांत 10423 जणांची कोरोनावर मात ! आज 1389 रुग्णांची भर

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील 16 तर ग्रामीणमधील 17 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात बठाण (ता. मंगळवेढा) येथील 17 वर्षीय तरुणाचा तर शहरातील नीलम नगर (एमआयडीसी परिसर) येथील 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे. शहरात आज तीन हजार 524 संशयितांमध्ये 252 तर ग्रामीणमध्ये आज नऊ हजार 337 संशयितांमध्ये एक हजार 137 रुग्ण वाढले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 ते 17 एप्रिल या काळात शहरातील 160 तर ग्रामीणमधील 142 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात 15 हजार 985 रूग्ण वाढले असून दिलासादायक बाब म्हणजे 17 दिवसांत दहा हजार 423 रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

शहर-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 78 हजार 377 झाली असून त्यातील दोन हजार 270 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृत्यूदराच्या तुलनेत रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिकच राहिले आहे. शहर-जिल्ह्यातील दररोज सरासरी तीनशे रूग्ण बरे होत आहेत. मात्र, मागील काही दिवसांत शहर-ग्रामीणमधील सरासरी 25 ते 30 रूग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे.

आज शहरातील 16 तर ग्रामीणमधील 17 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात बठाण (ता. मंगळवेढा) येथील 17 वर्षीय तरूणाचा तर शहरातील निलम नगर (एमआयडीसी परिसर) येथील 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे. शहरात आज तीन हजार 524 संशयितांमध्ये 252 तर ग्रामीणमध्ये आज नऊ हजार 337 संशयितांमध्ये एक हजार 137 रूग्ण वाढले आहेत. सद्यस्थितीत ग्रामीणमध्ये सात हजार 400 तर शहरातील तीन हजार 506 रूग्णांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आज माढ्यात सर्वाधिक 225, पंढरपूर तालुक्‍यात 210, बार्शीत 162, मंगळवेढ्यात 121, माळशिरसमध्ये 158, करमाळ्यात 86, मोहोळ तालुक्‍यात 56, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 36, सांगोल्यात 45, उत्तर सोलापूर व अक्‍कलकोट तालुक्‍यात प्रत्येकी 19 रूग्ण आढळले आहेत. लक्षणे असलेल्या संशयितांनी वेळेत उपचार घेतल्यास निश्‍चितपणे कोरोनावर मात करू शकतात, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, स्वच्छता राखावी, असे आवाहनही प्रशासनाने केली आहे.

शहरातील कोरोनाची स्थिती

  • एकूण रूग्ण : 21,289

  • बरे झालेले रूग्ण : 16,892

  • मृत्यू : 891

  • उपचार घेणारे रूग्ण : 3,506

  • ग्रामीणमधील कोरोनाची स्थिती

  • एकूण रूग्ण : 57,088

  • बरे झालेले रूग्ण : 48,309

  • मृत्यू : 1,379

  • उपचार घेणारे रूग्ण : 7,400