सोलापूर : वांगी येथे पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने दोघा भावाचा मृत्यू झाला
file photo
file photosakal

करमाळा - वांगी नंबर एक (ता. करमाळा) येथे उजनी जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे. समित दत्ता ढावरे (वय १८), रोहित दत्ता ढावरे (वय १६) मुळगाव रा. वांगी (ता. करमाळा) (सध्या रा. पुणे) असे मृत सख्या भावाची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी (ता. १७) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघे भाऊ आंघोळीसाठी स्मशानभूमीजवळ उजनी जलाशयात गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने दोघा भावाचा मृत्यू झाला. दोघे भाऊ पोहायला गेल्याची घरात कुणाला कल्पना नव्हती.

दत्ता गुलाब ढावरे यांचे कुटुंब सध्या पुणे येथे स्थायिक असून धार्मिक कार्यक्रमासाठी ते गावी आले होते. यावेळी हे दोघे अंघोळीसाठी गेले होते. मंगळवारी धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी सायंकाळी दोन्ही मुले कुठे दिसत नसल्याने शोधाशोध सुरू केली. मुले कुठेच अढळून न आल्याने वडील दत्ता ढावरे यांनी करमाळा पोलिसात तक्रार दिली आहे.

दरम्यान आज (गुरुवारी) मच्छीमारी करणाऱ्यांना रोहित ढावरे यांचे प्रेत उजनीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. ही खबर पोलिसांना देताच पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे पाठवली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com