'माझ्या मृत्यूला हे भाजप नेते जबाबदार...'; भाजप नेत्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

bjp, solapur
bjp, solapuresakal

Solapur BJP News: सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरुमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता.

त्या महिलेने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात सुदैवाने महिलेचा जीव वाचला असून सध्या तिच्यावर सांगोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती सध्या स्थिर आहे.

या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करण्या आगोदर एक व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे की, श्रीकांत देशमुख मला तुम्हाला शेवटचं बोलायचं आहे. मी आता जगण्याच्या लायकीची राहिली नाही. माझ्याजागी दुसरी मुलगी असती तर तिने हे पहिलचं केलं असतं. भाजपच्या लोकांना कळावं म्हणून मी हे पाऊल उचलत आहे.

bjp, solapur
ठाकरेंचं मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी 'हा' पक्ष बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार होता, पण...

माझ्याकडे काही पर्याय नसल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीकांत देशमुख, त्यांचे दोन्ही भाऊ हे जबाबदार असतील.

भाजपच्या नेत्यांना सांगून माझ्यावर एक केस केली आहे. त्यामुळे मला हे सर्व अनावर झाले आहे, त्यातून मी माझे जीवन संपवत आहे, असे सांगून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. Latest Marathi News

bjp, solapur
BRS: "काना मागून आली अन् तिखट झाली.." मविआ, महायुतीला धक्का देण्यासाठी 'हा' पक्ष सज्ज

काय आहे व्हिडीओ प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांनी मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात हनीट्रॅपमध्ये अडकल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान व्हायरल झालेल्या त्यांच्या कथित व्हिडिओमध्ये देशमुख बेडरूममध्ये एका महिलेसोबत दिसत आहेत. देशमुख यांच्यासोबत बेडरूममध्ये दिसलेल्या महिलेचे त्यांच्याशी काय नाते आहे, हे समजू शकले नाही. Marathi Tajya Batmya

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला आपला मोबाईल कॅमेरा देशमुख यांच्याकडे दाखवत आहे. देशमुख पलंगावर बसले आहेत.

तर महिला मोबाईल कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुख यांचे नाव घेते आणि त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करते.

हे ऐकून देशमुखही अंथरुणातून बाहेर आले आणि महिलेचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना ऐकू आले. त्यानंतर कॅमेरा बंद होतो. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी या महिलेविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात हनीट्रॅपची तक्रार दाखल केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com