उन्हाळ्यापर्यंत उजनीतून सुटणार तीनदा पाणी! जलविद्युत केंद्रातून १.५ कोटी युनिट वीजनिर्मिती

उजनी धरणावरील जलविद्युत केंद्रातून अवघ्या दोन महिन्यांत तब्बल दीड कोटींहून अधिक युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. अजूनही दररोज सरासरी तीन लाख युनिट वीज तयार करण्यात येत आहे.
ujani power house plant
ujani power house plantsakal

सोलापूर : उजनी धरणावरील जलविद्युत केंद्रातून अवघ्या दोन महिन्यांत तब्बल दीड कोटींहून अधिक युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. अजूनही दररोज सरासरी तीन लाख युनिट वीज तयार करण्यात येत आहे.

यंदा जूनऐवजी जुलै महिन्यात पावसाला सुरवात झाली. त्यानंतर हळूहळू ‘मायनस’मधील उजनी धरणाची वाटचाल ‘प्लस’मध्ये सुरू झाली. विशेषत: पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे धरणाने काही दिवसांतच शंभरी गाठली. दौंडवरून येणाऱ्या विसर्गामुळे धरणातून नदी, कॅनॉल व बोगद्यातून पाणी सोडण्यात आले. त्याचवेळी जलविद्युत केंद्राला दररोज सोळाशे क्युसेकने पाणी दिले. त्यातून वीजनिर्मिती सुरू झाली. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडच्या उद्दिष्टानुसार त्या प्रकल्पातून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत दीड कोटी युनिट वीज तयार करण्याचे टार्गेट दिले गेले. सुरवातीला एप्रिल ते जून या तीन महिन्यांत धरण मायनसमध्येच होते. त्यामुळे वीज निर्मिती प्रकल्प बंदच होता. जुलैच्या मध्यावधीत प्रकल्पातून वीज तयार करण्यास सुरवात झाली. त्यानंतर दोन महिन्यांत ते टार्गेट पूर्ण झाले. सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून ते शक्य झाल्याने अधीक्षक अभियंत्यांनी प्रकल्पावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ग्राहकांना स्वस्तात वीज उपलब्ध व्हावी, यासाठी ती वीज वापरली जाते. दरम्यान, आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, धरणातील पाण्याचे संभाव्य नियोजन केले जाईल. कालवा सल्लागार समितीच्या मान्यतेनुसार आवर्तनाचे नियोजन ठरेल.

अधीक्षक अभियंत्यांकडून प्रशस्तिपत्र

सार्वजनिक अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाद्वारे दिलेले वीजनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले. एका वर्षाचे टार्गेट अवघ्या सहा महिन्यांतच पूर्ण केल्याने नवीकरणीय ऊर्जा मंडळाने प्रकल्पास प्रशस्तिपत्र दिले आहे.

- मंजुनाथ बगाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उजनी जलविद्युत केंद्र

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • १२२.२९ टीएमसी

  • जिवंत पाणीसाठा

  • ५८.६४ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • १०९.४५ टक्के

  • धरणातून सोडलेले पाणी

  • ११६०० क्युसेक

उजनीतील पाण्याचे संभाव्य नियोजन

  • डिसेंबर-जानेवारीत रब्बीसाठी एक आवर्तन सोडले जाईल

  • मार्च-एप्रिल महिन्यात पाण्याची गरज पाहून एक आवर्तन

  • मे महिन्यात पुन्हा उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन सोडले जाणार

  • शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नदीतून दोन-तीन वेळा सोडले जाईल पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com