‘हुतात्मा’चे भाडे कमी होणार का? ढीगभर निवेदने, लोकप्रतिनिधींची मागणी, तरीपण कमी होईना भाडे

नाट्यकलावंतांसह अनेकांनी भाडेवाढ मागे घ्यावी, अशी निवेदने दिली. लोकप्रतिनिधींचीही तशी मागणी आहे, परंतु महापालिका प्रशासनाने अद्याप ताठर भूमिका सोडलेली नाही हे विशेष.
Praniti Shinde
Praniti Shinde sakal

सोलापूर : शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर या सांस्कृतिक सभागृहाची भाडेवाढ महापालिकेने कमी करावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तत्पूर्वी, नाट्यकलावंतांसह अनेकांनी भाडेवाढ मागे घ्यावी, अशी निवेदने दिली. लोकप्रतिनिधींचीही तशी मागणी आहे, परंतु महापालिका प्रशासनाने अद्याप ताठर भूमिका सोडलेली नाही हे विशेष.

सोलापूर शहरातील कलावंतांसाठी नेहमीच हुतात्मा स्मृती मंदिर सोयीचे ठरले आहे. अनेक ऐतिहासिक क्षणाचे ते सांस्कृतिक सभागृह साक्षीदार आहे. याठिकाणी दरवर्षी शहरातील खासगी व शासकीय शाळांची वार्षिक स्नेहसंमेलने होतात. त्यातून महापालिकेला उत्पन्न देखील मिळत होते.

अशावेळी अचानक कोणालाही विश्वासात न घेता उत्पन्न वाढीचे कारण सांगून महापालिका प्रशासनाने हुतात्मा स्मृती मंदिराची भाडेवाढ केली. नाट्यकलावंतांनी एकत्रित येऊन भाडेवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली. पण, अधिकाऱ्यांनी ती निवेदने गुंडाळून ठेवून दिली. आता आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यासंदर्भात निवेदन दिले असून त्यावर अधिकारी निर्णय घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांना खीळ घालणारी भाडेवाढ

हुतात्मा स्मृती मंदिराची भाडेवाढ अत्यंत अवाजवी असून हा निर्णय म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांना खीळ घालणारा आहे. पुणे, मुंबई, नाशिकसह विविध जिल्ह्यातील कलावंतांचे याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. भौगोलिकदृष्ट्या सोलापूर तसेही खर्चिक असून त्याच आता भाडेवाढ केल्याने बाहेरील कलाकारांसह सोलापुरातील हौशी कलाकारांना देखील परवडणारी नाही.

सांस्कृतिक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी सभागृह वाजवी दरात मिळावे, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे केली आहे. दरम्यान, भाडेवाढ मागे घ्यावी किंवा कमी करण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही तथा प्रस्ताव नसल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. वरिष्ठांकडून तशा काही सूचना नसल्याचेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com