
Solapur : लॅपटॉप व इतर साहित्य असलेली इंजिनियर महिलेची बॅग चोरट्याने केली लंपास
मोहोळ : शिवशाही बस मध्ये झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने लॅपटॉप व इतर साहित्य असलेली 70 हजार रुपया च्या वस्तु असलेली बॅग लंपास केल्याची घटना शुक्रवार ता 12 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोहोळ बस स्थानकात घडली.
या बाबत मोहोळ पोलीसा कडुन मिळालेल्या माहिती नुसार, अनुष्का शंतनू काळे रा. काडादी नगर, सोलापूर सध्या रा. सौदागर कॉम्प पुणे ह्या पासपोर्ट च्या कामासाठी आपल्या सासरी सोलापूर येथे आल्या होत्या. सोलापुरला आल्यावर वर्क फ्रॉम होम या नुसार कंपनीचे काम करता यावे म्हणुन त्यांना कंपनीने दिलेला आणी त्यांचा स्वःताचा असे दोन लॉपटॉप घेऊन त्या आल्या होत्या. पासपोर्टचे काम झाल्यावर त्या आपल्या पतीसह सोलापूर बसस्थानक येथे आल्या.
त्यांनी शिवशाही बस क्र एम एच 14/जीयु 3116 सोलापूर ते पुणे जाणाऱ्या बस चे तिकीट आरक्षीत केले होते. मध्ये बसल्यावर त्यांनी दोन लॉपटॉप व कागदपत्रके असलेली बॅग बस च्या वाहका जवळच्या शिटच्या वरच्या बाजुस ठेवली होती. बस मध्ये गर्दी होती.शिवशाही बस मोहोळ बस स्थानकावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आली. श्रीमती काळे यांना ठेवलेली बॅग दिसुन आली नाही.
त्यांनी सर्वत्र शोधाशोध करून बॅग मिळाली नाही ती चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी अनुष्का काळे यांनी आपल्या बॅगेतील 70 हजार रुपये किमंतीचे दोन लॉपटॉप,कंपनीचे ओळखपत्र,पॅनकार्ड व इतर महत्वाची कागदपत्र असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद मोहोळ पोलीसात दिली आहे. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.