सोलापूर : सिद्धेश्‍वर वुमन्स पॉलिटेक्‍निकमध्ये ‘इलेक्‍ट्रिकल वाहन’ विषयावर कार्यशाळा

प्रात्यक्षिकासह वाहनाची जोडणी; स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन
Electrical Vehicle
Electrical Vehiclesakal

सोलापूर : येथील श्री सिद्धेश्‍वर वुमन्स पॉलिटेक्‍निक कॉलेजमध्ये ‘इलेक्‍ट्रिकल वाहन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे त्याचे आयोजन करण्यात आले होते.पुणे येथील पायलॉन टेक्‍नोसॉफ्टचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश गरड, महादेव बनसोडे यांच्यामार्फत ही कार्यशाळा पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.(Workshop on Electrical Vehicles at Siddheshwar Women Polytechnic)

Electrical Vehicle
सोलापूर : बार्शीत अवैध सावकारी विरोधात एकावर गुन्हा दाखल

आगामी काळात इलेक्‍ट्रिक वाहन हा एक शाश्‍वत पर्याय असणार आहे. बॅटरी तंत्रज्ञान हा संशोधनाचा मोठा विषय आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी इलेक्‍ट्रिक सायकलचे घटक कसे एकत्र करायचे, यावर प्रात्यक्षिक पाहिले. त्याची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी इलेक्‍ट्रिक वाहनांचे महत्त्व, त्याच्या वापरामुळे कमी होणारे वायू व ध्वनी प्रदूषण, त्यातून उपलब्ध होणारा रोजगार, स्वयंरोजगार यावरही मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बी. नाडगौडा, प्राचार्य धरणे यांचेही यावेळी मार्गदर्शन लाभले. विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख प्रतीभा पाटिल, समन्वयक प्रा. नितीन बाणेगाव, प्रा. स्वाती अंकलगीकर यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com