कोरोना झालेल्यांचा तणाव होणार दूर ! झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांचा उपक्रम

जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या उपक्रमामुळे कोरोना रुग्णांना दिलासा
Stress
StressEsakal

सोलापूर : कोरोना महामारीने संपूर्ण जग व्यापले असून भीतीतून मानसिक तणाव निर्माण होऊ लागला आहे. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची बाधा झाली असून एकजण व्हेंटिलेटरवर तर दुसरा ऑक्‍सिजन आणि घरातील तिसरा सदस्य कोव्हिड केअर सेंटरवर असल्याची स्थिती आहे. त्या तणावातून अनेकांनी आत्महत्या केल्या असून हृदयविकाराचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा घेण्याचे नियोजन केले आहे. कोरोना रुग्णांसह ग्रामस्थांना त्याचा लाभ होणार आहे.

कोरोना होऊनही अनेकजण दवाखान्यात अथवा कोविड केअर सेंटरमध्ये राहण्याच्या भीतीने कोरोना टेस्टच करीत नसल्याची गंभीर स्थिती शहर-ग्रामीणमध्ये पहायला मिळत आहे. बरेचजण मानसिक तणावाखाली वावरत असून कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वजण तणावात दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांची भिती दूर करण्याच्या हेतूने हा उपक्रम सुरू केला जाणार असल्याचेही श्री. स्वामी यांनी सांगितले. कोरोनाग्रस्त रूग्णांना विविध प्रकारचा औषधोपचार, ऑक्‍सिजन पुरवठा सुरू आहे. मात्र, रूग्णांनी औषधोपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला तर तो रूग्ण लवकर बरा होऊ लागला आहे. सतत ताणतणावाखाली राहिल्याने आणि त्याच्या मनात भिती कायम असल्याने अनेकांना डोकेदुखी, हृदय ठोके वाढणे, चीडचीड, निद्रानाश, भूक न लागणे असे आजारही बळावत असल्याचे निदर्शनाला येत आहे. अशा गोष्टींतून रूग्णांना सावरण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे.

Stress
लोकसंख्या 46 लाख अन्‌ व्हेंटिलेटर 275 ! जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अपुरीच

उपक्रमासंबंधी ठळक बाबी...

  • कोविड रूग्णांसह ग्रामस्थांना सुरूवातीला ऑडिओ, व्हिडीओतून तज्ज्ञांचे दिले जाईल मार्गदर्शन

  • सध्या तज्ज्ञांना प्रत्येक ठिकाणी जाणे शक्‍य नसून गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत, मंदीर किंवा मस्जिदीवरील लाऊडस्पीकरवरून मार्गदर्शन होईल

  • प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकारांच्या माध्यमातून ताणतणाव कमी करण्यासाठी होणार प्रयत्न

  • जीवन जगण्याची इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन शिकविण्याचा होणार प्रयत्न; नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी रूग्णांमध्ये निर्माण केली जाईल जिद्द

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com