शौचालयेही होणार सौर दिव्यांनी प्रकाशमान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

सातारा - फुटकी भांडी, मोडके दरवाजे, दुर्गंधी व अस्वच्छता हे सार्वजनिक शौचालयांचे सर्वसाधारण चित्र असते. मात्र, चिमणपुरा पेठेतील सार्वजनिक शौचालये त्याला अपवाद ठरली आहेत. परिसराची स्वच्छता, दरवाजे-खिडक्‍यांची दुरुस्ती, रंगरंगोटी याबरोबरच आता शौचालयांमध्ये सौर ऊर्जेचे दिवे प्रकाशमान झाले आहेत. 

प्रभाग १८ मधील नगरसेवक वसंत लेवे यांच्या पुढाकाराने चिमणपुरा पेठेतील सार्वजनिक शौचालयांत नुकतेच हे दिवे बसविण्यात आले. कालच त्यांची चाचणी घेण्यात आली. सौर ऊर्जेवर चालणारे हे दिवे आहेत. 

या कामासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च आला आहे. हा खर्च लोकसहभागातून केल्याचे लेवे यांनी सांगितले. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या अनुभवाच्या जोरावर भविष्यात अधिक व्यापक प्रमाणात शहरातील इतर सार्वजनिक शौचालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लेवे यांनी सांगितले.

Web Title: solar lamp in toilet