कोल्हापूर : गिरगावातील जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मार्च 2019

कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील जवान सुरज साताप्पा मस्कर याचा डिंजान आसाम येथे सेवा बजावत असताना पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सैन्य प्रशासनाकडून आज सकाळी त्याच्या कुटुंबियांना ही माहिती कळविण्यात आली. अवघ्या तेवीस वर्षाच्या जवानांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळ पसरली आहे. सोमवारी सुरजचे पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे. 

मस्कर कुटुंबाची तिसरी पिढी सैन्य सेवेत आहे. सुरजचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले.या नंतर आंबोली येथे 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले.महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अवघ्या 18 वय वर्षी तो सैन्यात भरती झाला होता.दोन वर्षा पूर्वी त्याचा गावातीलच रेवती जाधव यांच्याशी विवाह झाला होता.सध्या तो 110 बॉम्बे इंजिनियरिंग बटालियन मध्ये कार्यरत होता.आसाम मधील डिंजाल येथे सेवा बजावत होता.एक महिन्याच्या सुट्टी नंतर तो 10 मार्च ला पुन्हा रुजू झाला होता.

आज पहाटे तो सहकाऱ्यांसह सेवा बजावत होता.यावेळी त्याला हृदय विकाराचा झटका येऊन तो कोसळला.सहकाऱ्यांनी त्याला दवाखान्यात दाखल केले मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.सकाळी सात च्या सुमारास त्याच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच मस्कर  कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गाव दुःखाच्या छायेत असून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सोमवारी त्याचे पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे. त्याच्या अंत्यसंस्काराच्या तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a soldier from kolhapur martyard due to heart attack