सिद्धेश्‍वर वन विहारात निसर्ग संवर्धनावर कार्यशाळा 

परशुराम कोकणे
सोमवार, 26 मार्च 2018

सोलापूर - जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच पशु-पक्ष्यांचा अधिवास कायम राहावा यासाठी जनजागृती करण्यासाठी रविवारी सिद्धेश्‍वर वन विहारात नेचर कॉन्झर्वेशन सर्कल आणि वन विभाग यांच्यावतीने कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांसह मोठ्यांनीही कार्यशाळेत सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व जाणून घेतले. 

सोलापूर - जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच पशु-पक्ष्यांचा अधिवास कायम राहावा यासाठी जनजागृती करण्यासाठी रविवारी सिद्धेश्‍वर वन विहारात नेचर कॉन्झर्वेशन सर्कल आणि वन विभाग यांच्यावतीने कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांसह मोठ्यांनीही कार्यशाळेत सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व जाणून घेतले. 

पहिल्या सत्रात नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य शिवानंद हिरेमठ यांनी गवताळ जंगले आणि त्यातील धावीक, माळटिटवी, पखुरडी, खाटीक व भारतीय खोकड यांच्याविषयी सखोल माहिती सांगितली. त्यानंतर सचिन पाटील, रत्नाकर हिरेमठ यांनी सिद्धेश्‍वर वनविहारामधील फुलपाखरांची माहिती दिली. त्यानंतर नागेश राव आणि प्रशांत पाटील यांनी सोलापुरातील पाणथळ व त्यावरील पक्षी जीवन या विषयी त्यांनी टिपलेल्या छायाचित्रातून निरीक्षण नोंदविले. डॉ. प्रतीक तलवाड यांनी चिमणीसाठी कृत्रिम घरटे बनविण्याचे प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन केले. 

रामेश्‍वर फुगारे यांनी झाडा-झुडपांचे औषधी महत्त्व, निसर्ग चक्रातील त्यांची भूमिका यावर वनविहारात फेरफटका मारत माहिती दिली. स्वप्नाली चालुक्‍य यांनी भारतीय राज्यघटनेतील निसर्गासाठी असलेले कर्तव्य व रक्षण या संदर्भात उदाहरणांसह माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात उप वनसंरक्षक संजय माळी यांनी लहानपणीच मुलांसाठी कार्यशाळा घेऊन निसर्ग संवर्धनात त्यांना ओढले गेले पाहिजे. कार्यशाळेस मदन पोलके व संतोष हिरेमठ हे गणेश नाईक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसहित उपस्थित होते. 

नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा, बालाजी चंद्रबन्सी, तरुण जोशी, संतोष धाकपाडे, राजकुमार कोळी, सोमानंद डोके, विकास माने, सुरेश क्षीरसागर, महादेव डोंगरे, पप्पू जमादार, "सकाळ'चे मुख्य उपसंपादक राजाराम कानतोडे, इको नेचर संस्थेचे मनोज देवकर, मोनिका माने, वैष्णवी नंदर्गी, नंदीकेश नंदर्गी आदी उपस्थित होते.

Web Title: Solhapur News Workshop on nature conservation in Siddheshwar Garden