सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 16 चे प्रश्न सोडवण्यासाठी सहा कोटी रुपयांच्या निधीची मुख्यमंत्र्याकडे मागणी

राजकुमार शहा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक 16 च्या  प्रलंबित मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समवेत केल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी दिली दरम्यान, मुख्यमंत्री  फडणवीस यांनी निधीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे क्षिरसागर यांनी सांगीतले. 

मोहोळ- मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक 16 च्या  प्रलंबित मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समवेत केल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी दिली दरम्यान, मुख्यमंत्री  फडणवीस यांनी निधीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे क्षिरसागर यांनी सांगीतले. 

यासंदर्भात अधिक माहिती  देताना  क्षीरसागर  म्हणाले, प्रभाग क्र.16 मध्ये शहराच्या दक्षिण हद्दवाढ भागाचा समावेश होतो. मात्र हा प्रभाग विकासापासुन कायम वंचीत असल्यामुळे या भागात नगरपरिषद स्थापन झाल्यापासून निधी मिळू शकला नाही. या बाबतची सविस्तर माहिती नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना दिली. याबाबत,.देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेत  सर्व समस्यांची माहिती जाणून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोहोळ मधील समस्यांबाबत सहकार मंत्र्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सदर मागण्याची लेखी निवेदन घेऊन मुंबईला सुशील क्षिरसागर यांना बोलावले. त्यानुसार क्षीरसागर यांनी मंत्री  देशमुख यांच्या समवेत मंत्रालयात जाऊन प्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून या मागण्यांचे निवेदन सादर करून सहा कोटी रुपयांच्या निधीची प्रभाग 16 मधील समस्या सोडविण्यासाठी देण्याची मागणी केली.

यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशी करून त्यांच्या प्रभागाच्या समस्यांबाबत लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्याना केली. सुशील क्षिरसागर यांनी केलेल्या मागण्यांना मंत्री देशमुख यांनी निधी बाबत लेखी शिफारस दिली. समस्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी  राज्याचे सहकार मंत्री देशमुख व नगरसेवक सुशील क्षीरसागर यांना दिले.

Web Title: Solution of Solapur Municipal Corporation ward 16 demanded a fund of Rs. 6 crores to Chief Minister