सोमर्डीत रुग्णालयालाच उपचाराची गरज! 

सोमर्डीत रुग्णालयालाच उपचाराची गरज! 

कुडाळ - डॉक्‍टर व अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे डोंगरी दुर्गम विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्‍यातील सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयालाच सध्या उपचाराची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने त्याचा आरोग्यसेवेवर परिणाम होताना दिसून येत आहे. 

सोमर्डीचे ग्रामस्थ संपतराव परामणे, तानाजी परामणे, गेणू परामणे आदींनी या रुग्णालयासाठी जागा दिल्याने हे रुग्णालय ४० वर्षांपूर्वी उभे राहिले. सध्या रुग्णालयाची दुमजली भव्य इमारत उभी असून, ३० खाटांच्या या रुग्णालयासाठी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी दोनच अधिकारी कार्यरत आहेत. एक पद अद्यापही रिक्त आहे. विषेशतः स्त्रीरोग तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ एकही उपलब्ध नाही, तसेच भूलतज्ज्ञ नसल्यामुळे यापूर्वी होणारे सिझर, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया सध्या होत नाहीत. रुग्णालयात अद्ययावत उपकरणांची कमतरता असून, एक्‍स-रे मशिनसह इतर काही मोजकीच उपकरणे उपलब्ध आहेत. मात्र, जी उपकरणे उपलब्ध आहेत, ती चालवणारे सक्षम कर्मचारी नसल्याने ती उपकरणे केवळ ‘शोपीस’ बनून राहिली आहेत. पाचगणी ते पाचवड या ३५ किलोमीटर अंतरात एकच ग्रामीण रुग्णालय असल्याने दररोज किमान २०० रुग्णांची तपासणीसाठी गर्दी होत असते. मात्र, त्यांना उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी पुरेशा प्रमाणात नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. 

जावळी तालुका दुर्गम असूनही तालुक्‍यात केवळ मेढा या ठिकाणीच   जुन्या इमारतीची जागा वापराविना  सोमर्डी रुग्णालयाच्या जुन्या इमारतीची जागा वापराविना पडून असून, तेथेही अस्वच्छता माजली आहे. रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका आहे. मात्र, ती चालवण्यासाठी कायमस्वरूपाचा वाहक नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com