कऱ्हाडला पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरले

some relief in flood situation in karhad
some relief in flood situation in karhad

कऱ्हाड : शहरात पडलेला पुराच्या पाण्याचा विळखा सुटू लागला आहे. पहाटेपासून कोयना व कृष्णा नदीचे पाणी कमी होवू लागले आहे. दोन्ही नद्यांची पातळी सुमारे चार फुटाने कमी झाली आहे.

दत्त चौकाला मध्यरात्री पुराच्या पाण्याने घेरले होते. आज चौक मोकळा झाला आहे. पुराच्या विळख्यातील कऱ्हाडची मुख्य बाजारपेठ, मुख्य रस्ता, यशवंत हायस्कूल, पायऱ्या खालील भाग मोकळा झाला आहे. कृष्णा घाटावरील पाणी पातळी घटू लागली आहे. पाटण शहरात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात ओसरत आहे. महाबळेश्वर, कोयना परिसरात पावसाचा जोरही आता कमी झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com