तू काही कमवत नाही, तुला मुलगी कोण देणार? 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. सरस्वती धावड आणि कुटूंबातील सदस्य जेवण करत बसले होते. त्यावेळी मुलगा अविनाश याने आईस माझे लग्न का करित नाहीस असे म्हणून वाद घातला...

सोलापूर : माझे लग्न का करत नाहीस असे म्हणून मुलाने आईशी वाद घातला. तु काही कमवत नाही, तुला मुलगी कोण देणार? असे म्हटल्यानंतर मुलाने मुलाने स्टिलच्या तांब्याने आईच्या डोक्‍यावर मारून जखमी केले आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अविनाश विद्याधर धावड (वय 28, रा. पोस्टल कॉलनी, विकासनगर, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. सरस्वती विद्याधर धावड (वय 55) असे जखमी आईचे नाव आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. सरस्वती धावड आणि कुटूंबातील सदस्य जेवण करत बसले होते. त्यावेळी मुलगा अविनाश याने आईस माझे लग्न का करित नाहीस असे म्हणून वाद घातला. आईने तु काही कमवत नाही, तुला दारू पिण्याची सवय आहे, तुला मुलगी कोण देणार असे सांगितले. त्यावर अविनाश याने जेवणाचे ताट फेकून दिले. शिवीगाळ करून स्टिलचा तांब्या घेवून आईच्या डोक्‍यावर मारले. जखमी आईने मुलाविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son beats old age mother at Solapur