पोटचा मुलगाच उठला बापाच्या जीवावर ... केले धक्कादायक कृत्य

son killed father in chandrapur
son killed father in chandrapur

वर्षानुवो वर्षे वडीलांचे दुखणं पाहून सिद्धाप्पा थकून गेला. उपचारावर पैसे खर्च करून करून तो थकला होता. आता बास पुरे झाले. बापाची आजारपणातून आपणच सुटका करायची असे त्याने ठरवलं. उपचाराला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याने "बापा'ला काकाच्या मदतीने आजारपणातून कायमचं मुक्त केलं. केलेलं पाप लपविण्यासाठी त्याने डॉक्‍टरांनीच उपचारात हलगर्जीपणा केल्याचा शो केला. हा शोच त्याच्या अंगलट आला आणि तो गजाआड झाला. 

चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात आहिरे नावाचे एकत्रित कुटुंब राहते. मोठा मुलगा काळबा हा शेती व्यवसायिक. दोन मुल,े पत्नी, लहान भाऊ त्याच्या कुटुंबाचा भार त्यांच्या अंगवार होता. लहान भाऊ शिकून शिक्षक बनला. तसा काळबा यांच्या अंगावरील भार थोडा कमी झाला. पण कालांतराने त्यांना आजारपण जडलं. तशी सर्व जबाबदारी ही त्यांच्या भावाच्या अंगावर येऊन पडली. बघता बघता काळबा यांची मुले मोठी झाली. ती शेती करू लागली. मात्र त्याचे वडील काळबा यांचे दुखणं काही कमी होत नव्हते. उपचारासाठी लागणाऱ्या पैशाची जमवाजमव करताना मुलांना आणि भावाची चांगलीच कसरत करावी लागत होती. आज ना उद्या बाबा बरे होतील या आशेने मुलांनीही सुरवातीला घरातील शिल्लक खर्च केली. सोने दागिने विकले. जमिनीचाही तुकडाही विकला. पण काळबा (बाबा) यांचे आजारपण कमी होण्याचे नाव घेत नव्हतं. बाबाची सेवा करण्याचे सिद्धाप्पाला काहीच वाटत नव्हतं. मात्र आर्थिक भार पेलणे त्याला अवघड बनत होते. आता बाबांची आजारपणातून कायमची सुटका करण्याचे त्याने ठरवलं. 

एक दिवस बर दोन दिवस दुखणं अशी परिस्थिती काळबा यांची झाली होती. सुमारे चार वर्षापूर्वी गोष्ट आहे. काळबा यांची सकाळीच प्रकृती खालावली. त्यांना घरच्यांनी भागातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काम धंदा सोडून दवाखान्यात "बाबा'ची सेवा करत बसण्यास सिद्धाप्पा वैतागला होता. त्याने काकाला याबाबत सांगितलेही. त्याच रात्री डॉक्‍टर काळबासह इतर रुग्णांची तपासणी केली. त्यांना औषधे देऊन ते निघून गेले. पहाटेच्या सुमारास काळबाच्या बेडजवळ झोपलेला त्याचा मुलगा सिद्धाप्पा व काका डॉक्‍टरांना मोठ मोठ्यांना हाका मारू लागले. बाबांना काय झालं बघा असा ओरडा करू लागले. तशी डॉक्‍टरांनी तातडीने धाव घेऊन काळबांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. रात्री रक्तदाब, मधुमेहसह सारे ठिक असताना अचानक असे कसे झाले? याचा प्रश्‍नही डॉक्‍टरांना पडला. पण झालं उलटच सिद्धाप्पा व त्याचा काका यांनी डॉक्‍टरांनीच उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप सुरू केला. याची माहिती मिळताच जमा झालेल्या नातेवाईक व मित्रपरिवारांनीही संबधित डॉक्‍टरांची चौकशीची मागणी सुरू केली. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. नातेवाईकांचा विरोध असतानाही मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मात्र त्याचा अहवाल येण्यास वेळ लागणार होता. पण डॉक्‍टरांचा प्राथमिक अंदाज हा त्यांचा नैसर्गिक अगर आजारपणाचा मृत्यू नसल्याचा होता. त्याने पोलिस यंत्रणा हडबडून गेली. 

पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली. डॉक्‍टरांकडे माहिती घेतली. त्यात काळबा यांचे एकाएकी असे होणे याबाबत शंका व्यक्त करण्यात आली. तपासातील एक अधिकारी डॉक्‍टर पदवीधारकच. त्यांनी या आजारपण व उपचाराबाबत खोलवर जाऊन चौकशी केली. त्यात त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. यानंतर रुग्णलयातील सीसी टीव्ही तपासले. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली. सख्या मुलानेच (सिद्धाप्पा) काकाच्या मदतीने रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या बाबाच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केल्याचे तपासात पुढे आले. उत्तरकार्याचा कार्यक्रम झाल्यानंतर काळबाच्या घरी गेलेल्या पोलिसांना पाहून त्याचा मुलगा सिद्धाप्पा हडबडून गेला. पोलिसांनी विचारलेल्या एक दोन उलट सुलट प्रश्‍नावर तो घडाघडा बोलू लागला. त्याने वडिलांची आजारपणातून मुक्तता करण्यासाठी सुटका केली. मी उशी तोंडावर दाबली अन्‌ काकानं त्याचं पाय दाबलं अशी कबुली दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com