लग्न का करत नाही म्हणून मुलाने केला आईचा खून 

लग्न का करत नाही म्हणून मुलाने केला आईचा खून 

सोलापूर - रविवारी साजरा झालेल्या मदर्स डेचा उत्साह असतानाच सोलापुरात सोमवारी एका मुलाने माझं लग्न का करत नाहीस असे म्हणून आईचा खून केला. याप्रकरणात मुलास अटक करण्यात आली आहे. 

नागमणी विजय कायत (वय 52, रा. विकास लॉजच्या मागे, जोडभावी पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मुलगा मोहीत विजय कायत (वय 27) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझं लग्न का करत नाहीस असे म्हणून मोहीतने त्याची आई नागमणी हिच्याशी वाद घातला. त्याने वायरने आईचा गळा आवळला. बेशुद्ध होवून आईचा जागीच मृत्यू झाला. 

शवविच्छेदन केल्यानंतर नागमणीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणात नातेवाईक फिर्याद देण्यास तयार नव्हते. शेवटी मोहीतच्या वडीलाने फिर्याद दिली. रात्री उशिरा जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत केडगे तपास करीत आहेत. मोहीत यास अटक करण्यात आली आहे. 

मोहीत यास गांजाचे व्यसन होते. गांजा बंद केल्याने त्याला त्रास होत होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच त्रासातून त्याने आईशी माझं लग्न का करत नाही म्हणून वाद घातला आणि गळा आवळून तिचा खून केला आहे. 
- डॉ. दीपाली काळे,  सहायक पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com