‘सोनहिरा’ ठरला देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कडेगाव - सोनहिरा साखर कारखान्याला  २०१७-१८ चा  देशांतील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय साखर कारखाना संघाकडून पुरस्कार दिले जातात. येत्या १० सप्टेंबरला पुरस्कार प्रदान समारंभ आहे. कडेगाव सारख्या कायम दुष्काळी तालुक्‍याच्या कृषी व औद्योगिक प्रगतीची संधी या कारखान्यामुळे या भागाला मिळाली आहे. आमदार मोहनराव कदम यांनी ही माहिती दिली.

आमदार कदम म्हणाले,‘‘ प्रतिकूल परिस्थितीतही या कारखान्याने चांगला ऊसदर दिला. सर्वोत्तम नियोजनामुळे कारखान्याला सन २०१७-१८ मधील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  कारखान्याचा आता देश पातळीवर लौकिक निर्माण झाला आहे. सभासद, कर्मचारी यांच्या प्रगतीसाठी कारखान्याने नेहमीच  धोरणे ठरवली. त्याचे फलीत म्हणूनच ही यशस्वी वाटचाल सुरु आहे. ’’ 

यापूर्वी सोनहिराला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडील राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता दक्षिण विभाग पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सोनहिरा कारखान्याचे संस्थापक पतंगराव कदम भाषणांत नेहमी म्हणायचे की,सोनहिरा साखर कारखाना एक दिवस देशांतील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना असेल.  आज सोनहिराला राष्ट्रीय साखर संघाचा देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला. (कै.) कदम यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Web Title: Sonhira Sugar Factory Number One in India