धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांना झटका !

धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांना झटका !

सोलापूर : दिवाळीत अवेळी फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करून झटका दिल्यानंतर पोलिसांनी शहरातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंगे, स्पीकरकडे मोर्चा वळविला आहे. बंदी असतानाही रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेस स्पीकर लावून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी तसेच विनापरवाना ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी मंदिर आणि मशिदीच्या संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

रात्री 10 ते सकाळी सहा या वेळेत कोणालाही स्पीकर लावण्यास परवानगी मिळणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. मंदिर, मशीद यासह सर्वच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी स्पीकर लावण्यासाठी परवानगी आवश्‍यक आहे परवानगीशिवाय स्पीकर लावणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पहाटे मंदिर आणि मशिदींवर स्पीकर लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

चौपाड येथील विठ्ठल मंदिराचे सदानंद दत्तात्रेय धावडे, जुना विडी घरकुल परिसरातील मोमीननगर येथील मुनौबर अरबी मदरसा व मशीदच्या दस्तगीर इमामसाब आत्तार, नई जिंदगी परिसरातील शिवगंगानगर येथील तोहीद मशीदचे दस्तगती अब्दुल रहमान शेख, शेळगी परिसरातील जामे मज्जिदचे मौलाना ताहीर महंमदअली शेख, कुरेशी गल्ली खाटीक मशीदचे अन्वर माहमुद कुरेशी, बागे मदिना मशिदचे अब्बास अलीस हाजी इस्माईल शेख, विजयपूर नाका परिसरातील नुरानी मशीदचे मौलाना जाफर हैदरसाब जमादार, कवठे परिसरातील जामे मशीद व कब्रस्तानचे अध्यक्ष सरदार उस्मान शेख यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात काही सकाळी सहापूर्वी स्पीकर लावल्याचे तर काही विनापरवाना स्पीकर लावल्याचे गुन्हे आहेत.

कोणत्याही धार्मिक स्थळावर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत स्पीकर लावता येणार नाही. या संदर्भात सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. परवानगीशिवाय दिवसा स्पीकर लावणाऱ्यांवरही कारवाई होईल. कोणीही शासनाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. ही मोहीम यापुढेही अशीच चालू असणार आहे. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com