सोलापूर - जिल्ह्यात 54 हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

सोलापूर : जिल्ह्यात यंदा 54 हजार 297 हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची
पेरणी झाली आहे. सोयाबीनने 100 ची टक्केवारी ओलांडली आहे. तुरीची
आतापर्यंत 88 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून
देण्यात आली.

सोलापूर : जिल्ह्यात यंदा 54 हजार 297 हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची
पेरणी झाली आहे. सोयाबीनने 100 ची टक्केवारी ओलांडली आहे. तुरीची
आतापर्यंत 88 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून
देण्यात आली.

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 79 हजार हेक्‍टर क्षेत्र निर्धारित केले
आहे. त्यापैकी 54 हजार 297 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पेरणीची एकूण
टक्केवारी 69 टक्के इतकी आहे. जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन व तुरीचे
क्षेत्र वाढतच चालले आहे. मात्र, दर पाच वर्षाची सरासरी पेरणीचे क्षेत्र
काढून एकूण पेरणीचे क्षेत्र निश्‍चित केले जात असल्यामुळे कृषी विभागाने
निश्‍चित केलेल्या पेरणीच्या क्षेत्राचे आकडे खूपच कमी असल्याचे दिसून
येते. मागील तीन-चार वर्षापासून सातत्याने खरीपामध्ये तूर व सोयाबीन या
पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. साहजिकच त्याचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर होत असल्याचे दिसून येते. तुरीसाठी 24 हजार 45 हेक्‍टर क्षेत्र निर्धारित केले असताना प्रत्यक्षात 21 हजार 114 हेक्‍टरवर त्याची पेरणी झाली आहे. तीच स्थिती सोयाबीनबाबतही आहे. सोयाबीनसाठी केवळ पाच हजार 451 हेक्‍टर क्षेत्र निर्धारित केले आहे. प्रत्यक्षात पाच हजार 500 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनची पेरणी जवळपास 30 ते 40 हजार हेक्‍टरवर होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मकेची पाच हजार 713 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 10 हजार 805 हेक्‍टरवर उडीद तर दीड हजार हेक्‍टरवर सुर्यफुलाची पेरणी झाली आहे. अक्कलकोट, बार्शी या
तालुक्‍यांमध्ये खरिपाच्या पेरण्यांचा जोर दिसून येतो.

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी
उत्तर सोलापूर-60, दक्षिण सोलापूर-46, बार्शी-105, अक्कलकोट-65,
मोहोळ-64, माढा-59, करमाळा-52, पंढरपूर-67, सांगोला-57, माळशिरस-59, मंगळवेढा-52, एकूण-63 टक्के

Web Title: sowing of kharip in 54 hector in solpaur district