esakal | सोयाबीनचे दर दुप्पट
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा सोयाबीनचे दर दुप्पट

यंदा सोयाबीनचे दर दुप्पट

sakal_logo
By
विकास पाटील

निपाणी : यंदा महापूर, अतिवृष्टीमुळे निपाणी भागातील पिके पाण्यात गेल्याने नुकसान झाले आहे. यंदा निपाणी भागात 6 हजार 700 हेक्टरचे उदिष्ट असताना शेतकरयांनी 5 हजार 327 हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक घेतले होते. यामध्ये 1 हजार 832 हेक्टरमधील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व महापुराने सर्वच पिके गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीनचे उत्पन्न घटल्याने बाजारात त्याचे दर तेजीत आहेत. दहा पाॅईंट हवेला 85 रुपये दर दिला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे दर दुप्पट झाल्याने शेतकरयांमध्ये कही खुशी कही गम असेच वातावरण आहे.

हेही वाचा: इस्लामपूर पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून वैभव साबळेंची नियुक्ती!

यंदा केवळ अनेक शेतकरी सोयाबीनचे पीक घेतले होते. ते फुलोरयावर येत असताना महापुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे ते भुईसपाट झाले तर काही ठिकाणी पूर्णपणे कुजून गेले. काही ठिकाणी सोयाबीन कापणी, मळणी एकाच रक्कमेत दिली जात आहे. त्यामुळे मजूर त्यालाच पसंती देत आहेत. बाहेरून सोयाबीनची आवक झाल्याचे शेतकरयांतून बोलले जात आहे. त्यामुळे हे दर व्यापारी कमी करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या भागातील सोयाबीन दर्जेदार असल्याने दर मिळत आहे.

हेही वाचा: 'मी आलो अन् महापूर यायला लागले, असे समजून घेऊ नका'

"यंदा अतिवृष्टी, महापुराने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीची पाहणी केली आहे. यावर्षी उत्पादन घटले आहे."

-पुरुषोत्तम पिराजे, कृषी अधिकारी, निपाणी

"यंदा पावसामुळे सोयाबीनचे जास्त नुकसान झाले आहे. दोन दिवसापासून पाऊस सुरु झाल्याने कापणी, मळणीत व्यत्यय येत आहे."

-अमित खोत, शेतकरी, जत्राट

हेही वाचा: अक्कलकोट: शिरवळवाडीजवळ अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

दृष्टिक्षेपात...

  • सोयाबीनची पेरणीचे उद्दीष्ट - 6 हजार 704 हेक्टर

  • सोयाबीनची पेरणी - 5 हजार 327 हेक्टर

  • नुकसान1 हजार - 832 हेक्टर

  • मळणीसाठी मजुरी - 250 रूपये

  • यंत्राद्वारे क्विंटलला मळणी दर - 300 रुपये

  • 10 पाॅईंट हवेला दर - 85 रुपये

loading image
go to top