आषाढीच्या नियोजनाचा स्पेन करणार अभ्यास

आषाढीच्या नियोजनाचा स्पेन करणार अभ्यास

सोलापूर- दक्षिणेची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरीत आषाढीला तसेच जानेवारीत सोलापुरात भरणाऱ्या गड्डा यात्रेतील गर्दीच्या नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी स्पेन मधील मुर्सिया देशाचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे.

शाश्‍वत शहरी विकास योजनेंतर्गत सोलापूरच्या महापौरांसह पाच जणांच्या शिष्टमंडळाने मोर्शियाला भेट दिली. या शिष्टमंडळात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि नगरअभियंता संदीप कारंजे यांचा समावेश होता. 

मोर्शिया शहर हे अप्रतिम आहे. त्या ठिकाणी कचऱ्याचे अतिशय चांगले व्यवस्थापन करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अवघ्या काही मिनिटांत पूर्ण केले जाते. तेथील पाणीपुरवठ्याचे 24 तास असलेले नियोजन सोलापूर स्मार्ट शहर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याच धर्तीवर शहरातही विकास योजना राबविल्या जाणार आहेत, असे  सौ. बनशेट्टी म्हणाल्या. 

पाच दिवसांच्या दौऱ्यात कार्यशाळा आणि ऐतिहासिक स्थळांची पाहणी व विविध विकासकामांची माहिती घेण्यात आली. मोर्शिया शहर 2020 मध्ये कसे असेल, याचे चित्र त्यांनी कार्यशाळेत स्पष्ट केले. नागरिकांना उच्च दर्जाच्या नागरी मूलभूत सुविधा कशा देता येतील, याची माहिती देण्यात आली.

शहरातील स्मार्ट बिल्डिंगची माहिती देण्याबरोबरच पाणीपुरवठा व जलशुद्धीकरण केंद्राची माहिती तसेच स्वच्छतेसंदर्भातील व्यवस्थापन व नियोजन दाखवून देण्यात आले. सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीचा एक उत्तम नमुना मोर्शिया शहरात पाहावयास मिळाला. या धर्तीवर सोलापूर शहरातही त्याचे अनुकरण करून शहरातील नागरिकांना उच्च दर्जाच्या नागरी सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे, असेही महापौर म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com