होमिओपॅथिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. शाकीर सय्यद यांना विशेष पुरस्कार

हुकूम मुलाणी
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - लापूर होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे होमिओपॅथिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल विशेष पुरस्कार मंगळवेढा येथील डॉ. शाकीर सय्यद यांना पंढरपूरात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. 

सेंट्रल कौंसिल ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, दुसरे उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. संजीव डोळे, होमिओपॅथिक क्षेत्रातील रविंद्र भोसले, डॉ. रत्ना भिसे, डॉ. योगेश रणदिवे, डॉ. नितीन आदमाने, डॉ. प्रवीण कुंभार, डॉ. मिलिंद हिंगमिरे, डॉ. सुनील येरनाळे, डॉ. कालिदास लिमकर, डॉ. संजय देशमुख मान्यवरांच्या हस्ते  सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागात होमिओपॅथिचे अलसफा हे क्लिनिक सुरु करून लोकांना त्या औषधाचे महत्त्व पटवून देत, अशा प्रकारच्या उपचाराची कसलीही पार्श्वभूमि नसताना डॉ. सय्यद यांनी आपली सेवा सुरु केली. डॉ. शाकीर सय्यद आणि त्या पत्नी डॉ. शबनम सय्यद या दांपत्याने मोठ्या शहरात जाण्याऐवजी मंगळवेढ्यात ही सेवा सुरु केली. रुग्णांचा विश्वास संपादन करणे, औषध उपचाराने त्या विश्वासास पात्र ठरत यशस्वी होण्याचा प्रवास हा प्रतिकूल परिस्थितीतील होता. आज ते मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूरपर्यंत आपल्या सेवेतून कार्यरत आहेत. 

अतिशय चिकित्सकपणे मानसिक, शारिरीक इलाजाच्या पद्धतीमध्ये हातखंडा असणा-या या दांपत्याने चांगली विश्वासार्हता निर्माण केली. त्याचाच सन्मान म्हणून या महत्त्वाच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

Web Title: Special award for Shakir Syed for work in the homeopathic sector