पंतप्रधान किसान योजनेतील त्रुटीच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाची विशेष मोहीम 

सचिन निकम 
Monday, 27 July 2020

लेंगरे(सांगली)- पंतप्रधान किसान योजनेसाठी प्रशासनाकडून ता. 5 ऑगस्ट पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्गामुळे नागरी क्षेत्रात लॉकडाऊन तर ग्रामीण भागात ता. 30 पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या विशेष मोहिमेच्या माध्यामातून नवीन नाव नोंदणी, आधार लिकींग, बॅंक खात्यातील दुरुस्ती यासह कामांच्या अन्य कामासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, ता घरात थांबावे तुमच्या किसान योजनेतील त्रुटी गावात सोडविल्या जातील असे आवाहन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी केले आहे. 

श्री. शेळके म्हणाले,"केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याचे दृष्टीने प्रधानमंत्री किसान सम्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत अल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रूपये अनुदान देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू केली आहे. कोरोना आपत्ती काळात शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर फायदा व्हावा यासाठी प्रशासनाकडून सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु आहेत. गावकामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना विशेष मोहिमेतील राबविण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहे.

त्रुटीच्या याद्या गावपातळीवर प्रसिद्ध करण्यास सांगितल्या आहेत. त्यानुसार शेतकर्यानी संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्रुटीची पुर्तता करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी स्वत: नोंदणी केली आहे. त्यांची स्थानिक पातळीवर चौकशी करुन पात्र, अपात्र ठरविले जाणार आहेत. यामध्ये कुटुंबातील सर्व ठिकाणचे लागवडीलायक क्षेत्र दोन हेक्‍टर क्षेत्र असेल त्यांनाच यांचा लाभ देण्यात आला आहे. ही सगळी योजना प्रशासनाने प्रभावीपणे राबविण्याचे काम सुरु आहे. लॉकडाऊन, जनता कर्फ्यू असला तरी या प्रक्रियेस ब्रेक न लावता काम सुरु राहणार आहे." 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special campaign of the administration to correct the error in the Prime Minister's Kisan Yojana