शिक्षकांच्या अधिवेशनाला फक्त तीन दिवसांची विशेष रजा

शिक्षकांच्या अधिवेशनाला फक्त तीन दिवसांची विशेष रजा

वाडा - अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या पणजी, गोवा येथे होणा-या शिक्षक अधिवेशनाला महाराष्ट्र शासनाने केवळ तीनच दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मंजूर केल्याने दहा दिवसांची रजा घेवून सुट्टी उपभोग पाहणा-या शिक्षकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.

शिक्षक नेते व माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे दि. 7, 8 व 9 फेब्रूवारी रोजी शिक्षकांचे विशेष अधिवेशन पणजी,गोवा येथे आयोजीत केले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणतीही विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याच्या अगोदरच या संघटनेच्या शिक्षक नेत्यांनी शाळा शाळेमध्ये जाऊन अधिवेशनासाठी शिक्षकांना दि.4 फेब्रूवारी ते 13 फेब्रूवारी या कालावधीत दहा दिवसाची विशेष रजा मिळेल असे आश्वासन देऊन शिक्षकांकडून प्रत्येकी काही रूपयांचा अधिवेशन निधी गोळा केला.

संघटनेच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून पावत्या फाडलेले शिक्षक सोमवारी 4 फेब्रूवारी पासून सूट्टीवर गेले परंतु, याच दिवशी संध्याकाळी शासनाने शिक्षक अधिवेशनासाठी आदेश निर्गमित करून केवळ 7, 8 व9 फेब्रूवारी अशी तीनच दिवसांची विशेष अधिवेशन रजा मंजूर केली तसेच या रजेच्या कालावधीतील विद्यार्थ्यांचा अभ्यास दररोज किंवा रविवारी ज्यादा तास भरवून पूर्ण करावा असे आदेशात म्हटले आहे.

शासनाच्या या आदेशाने अधिवेशनाला दहा दिवस सूट्टी घेऊ पाहाणा-या शिक्षकांचा पूरता भ्रम निरास झाला. अधिवेशनाच्या नावाने निधीही दिला आणि रजेमध्ये कपात झाली. त्यातच अधिवेशनासाठी जाणा-या शिक्षकांच्या शाळा बंद राहिल्यास त्या चालविण्याची जबाबदारी अधिवेशनाला न जाणा-या शिक्षकांनी घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने गटशिक्षण अधिका-यांनी ही जबाबदारी त्या त्या मुख्याध्यापकावर सोपवली. त्यामुळे अधिवेशनाच्या रजेची खुशीत गाजरे खाणा-या  शिक्षकांच्या कपाळावर हात मारण्याची वेळ आली.

शिक्षकांचा अतिउत्साहीपणा 
अधिवेशना संदर्भात शासनाचे आदेश प्राप्त होण्या अगोदरच शिक्षकांनी शाळा बंद करून सुट्टी घेतली. यात शिक्षकांचा अती उत्साहीपणा दिसून येत असून या अतिउत्साहीपणा मुळे मात्र विद्यार्थांचे नुकसान होत आहे. 

शिक्षक अधिवेशनाचे अधिकृत पत्र अद्यापपर्यत मला प्राप्त झालेले नाही. तसेच तालुक्यातील केंद्र प्रमुखांना सुचना देऊन तालुक्यातील किती शाळा सोमवार दि. 4 पासून बंद आहेत. व किती शिक्षक सुट्टी वर गेले आहेत याची माहिती मी मागवली आहे. 
- जयवंत खोत, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिक्षण विभाग वाडा  

केंद्र सरकारचे 4 ते 13 व राज्य सरकारने 7 ते 9 या कालावधीत शिक्षकांच्या अधिवेशनाला परवानगी दिली असून तालुक्यातून सुमारे 375 ते 400 च्या आसपास शिक्षक अधिवेशनाला गेले आहेत. 
- प्रदीप पाटील, अध्यक्ष-अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वाडा तालुका 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com