कराड-मिरज दरम्यान रेल्वेची विशेष गाडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पुरामुळे रस्ते वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा निर्णय

पुणे ः जोरदार पावासामुळे कराड ते सांगली दरम्यान रस्ते मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे सांगली, कराड, मिरजसह परिसरातील नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारपासून (ता.8) पुढली तीन दिवस कराड ते मिरज दरम्यान विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली, कराड, कोल्हापूर, मिरजसह परिसरामध्ये पुराणे अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे रस्ते वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कराड ते मिरज दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ही गाडी गुरुवारी दुपारी 12 वाजून पाच मिनिटांनी मिरज स्थानकातून सुटून दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी कराड येथे पोचणार आहे. तर कराड स्थानकातून दुपारी 2 वाजता ही गाडी सुटून 3 वाजून 40 मिनिटांनी मिरज येथे पोचणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मिरज स्थानकातून सोलापूर-पंढरपूर एक्‍स्प्रेस गाडी पकडता येणार आहे. परिणामी, या भागतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special train for Karad to Miraj