भाजप महामेळाव्यासाठी सोलापुरातून विशेष रेल्वे

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 2 एप्रिल 2018

नगरसेवक लागले कामाला, कार्यकर्त्यांची जमवाजमव

सोलापूर: येत्या शुक्रवारी (ता.6) मुंबईत होणाऱ्या भाजप महामेळाव्याला जाण्यासाठी सोलापुरातून दोन विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कार्यकर्ते जमविण्यासाठी प्रत्येक नगरसेवक कामाला लागले असून, जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभाग 14 मध्ये याच दिवशी पोटनिवडणुकीचे मतदान आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांना सवलत देण्यात आली आहे.

नागपूर महापालिकेतील नगरसेवकांना किमान 50 कार्यकर्त्यांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर येथील नगरसेवकांनाही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा खलिता मिळाला आहे. त्यानुसार प्रभागात बैठका घेणे, विशेष रेल्वेची सोय केल्याची माहिती दिली जात आहे. प्रत्येक नगरसेवकाने प्रत्येकी पाच कार्यकर्ते तयार केली तरी प्रभागातून 20 कार्यकर्ते होतील. जास्त प्रयत्न केला तर ही संख्या 30 ते 35 पर्यंतही जाऊ शकते. ज्या प्रभागात भाजपचे नगरसेवक नाहीत, तेथील भाजपच्या प्रभाग अध्यक्ष व पराभूत उमेदवारावर कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या तिकीटाचा खर्च करण्याची जबाबदारी पालकमंत्री व सहकारमंत्र्यांवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेत भाजपचे 49 नगरसेवक आहेत. त्यापैकी 26 नगरसेविका, तर 23 नगरसेवक आहेत. या शिवाय दोन स्वीकृत सदस्य आहेत. या प्रत्येकाने किमान 25 कार्यकर्ते तयार केले तर ही संख्या 1275 वर पोचणार आहे. काही प्रभावशील नगरसेवक 75 ते 100 कार्यकर्ते नेण्याचेही नियोजन करीत आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील भाजप कार्यकर्तेही या रेल्वेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विशेष रेल्वेतून दोन ते अडीच हजार कार्यकर्ते रवाना होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गुरुवारी निघणार विशेष रेल्वे
या महामेळाव्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानाकवरून गुरुवारी (ता.5) दुपारी तीन वाजता विशेष रेल्वे निघणार आहे. मुंबईत उतरल्यावर मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सीएसटी येथे विशेष बसची सुविधा आहे. 6 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता ही रेल्वे परतीच्या प्रवासासाठी निघणार आहे. कार्यकर्त्यांना रेल्वेतच अन्नाची पाकिटे देण्याची सोय करण्यात आली आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी सांगितले.

Web Title: special trains from Solapur to BJP rally