'रक्षाबंधन'साठी एसटीची विशेष प्रवाशी वाहतूक सेवा …!

राजशेखर चौधरी
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

अक्कलकोट : यंदाच्या 'रक्षाबंधन' सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले असून प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली ता.२५ ते २७ ऑगस्ट रोजी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने अक्कलकोट आगारातून या तीन दिवसांच्या काळात गरजेनुसार ज्यादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आगार प्रमुख रमेश मंथा यांनी दिली. 

यामुळे या सणाच्या आणि सुट्टीच्या काळात स्वामी समर्थ मंदिरास येणाऱ्या वाढत्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. महामंडळ स्तरावर जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात एसटी बसस्थानके, बस थांबे येथे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश परिवहन मंत्री व एसटी मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनास दिले आहेत. त्याबरोबरच प्रवाशी बांधवांनी 'एसटीरुपी बहिणीला केवळ एसटीतूनच प्रवास करीन' असे ओवाळणीरुपी अभिवचन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ-बहिणीच्या भावनिक नात्याचा सण म्हणून 'रक्षाबंधन' सणाला अनन्य साधारण महत्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे अथवा बहिण भावाकडे ओवाळण्यासाठी जात असतात. साहजिकच या दिवशी प्रवाशी वाहतूकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून एसटीने यंदा आगार पातळीवर मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. सुरक्षित प्रवास वाहतूक करुन प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाने ठेवली आहे. त्यासाठी प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवाशी मित्र, तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मार्गस्थ निवाऱ्यावर जादा वाहतूकीची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करुन प्रवाशांना सुरक्षित व वक्तशिर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतील. यास्तव अक्कलकोट आगरातूनही स्थानक प्रमुख बाबा बनसोडे, वाहतूक नियंत्रक श्रीमंत ऐवळे आदी प्रवाश्याना चांगली सेवा देता यावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Special Transportation Service of ST for Rakshabandan