मोदींची भाषणे म्हणजे - बंबई देखो..दिल्ली देखो...

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 10 मे 2018

सोलापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी भाषणे करीत आहेत, त्याचे स्वरुप बंबई देखो...दिल्ली देखो...सारखे
असल्याचा टोला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंद यांनी लगावला. 

सोलापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी भाषणे करीत आहेत, त्याचे स्वरुप बंबई देखो...दिल्ली देखो...सारखे
असल्याचा टोला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंद यांनी लगावला. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर शिंदे बोलत होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची स्थिती खूपच चांगली आहे, असे सांगून ते म्हणाले, या ठिकाणी आम्ही निर्विवाद सत्ता स्थापन करू. काँग्रेसला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पंतप्रधान फार चिडले आहेत. त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करीत आहेत. एखादा पंतप्रधान राज्यात पंधरा ते वीस सभा घेतो यातच सर्वकाही आले. 

तीन ते चार सभा आपण समजू शकतो, पण ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार स्ट्राँग आहे त्या ठिकाणी मोदी सभा घेत आहेत आणि हीन पातळीवर टीका करत आहेत.

ज्या ठिकाणी मोदी सभा घेतात त्या ठिकाणी काही बोलतच नाहीत. विकासाचा मुद्यावर तर नाहीच बोलत. त्यामुळे आपल्याकडे यात्रेत जसे दृश्य दिसते, दिल्ली देखो..बंबई देखो.. पण दिल्लीही दिसत नाही आणि बंबईही दिसत नाही. दाखविणारा डबा टाकून तसाच निघून जातो, त्या पद्धतीने मोदींचा प्रचार सुरु झाला आहे. हा प्रचार मतदारांच्याही लक्षात आल्याने काँग्रेसलाच मतदार पुन्हा सत्तेवर बसवतील याची खात्री आहे, असेही शिंदे म्हणाले.
 

Web Title: speeches of modi like bambai dekho delhi dekho