स्पीड ब्रेकर्स, दुभाजक, रिफ्लेक्‍टर्सचाही अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

साताऱ्याच्या सुधारित वाहतूक आराखड्यात पोलिस, वाहतूक शाखा, सल्लागारांकडून उपाययोजना 

साताऱ्याच्या सुधारित वाहतूक आराखड्यात पोलिस, वाहतूक शाखा, सल्लागारांकडून उपाययोजना 
सातारा - शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणून सुरक्षितता आणण्यासाठी कोणत्या ठिकाणी रस्ता दुभाजक, स्पीड ब्रेकर्स व रिफ्लेक्‍टर्स बसविणे आवश्‍यक आहे, याचा अभ्यासही सुधारित वाहतूक आराखड्यात करण्यात आला आहे. शहर वाहतुकीच्या सुधारित आराखड्यामध्ये पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेचे अधिकारी, तसेच वाहतूक सल्लागार समितीने अत्यंत बारकाईने विविध उपाययोजना मांडल्या आहेत. सुरक्षित वाहतुकीसाठी रस्त्याची स्थिती व त्यावर आवश्‍यक असणाऱ्या गोष्टींबाबतही यामध्ये विचार करण्यात आला आहे. त्यातून शहरात कोणत्या ठिकाणी रस्ता दुभाजक, स्पीड ब्रेकर, तसेच रिफ्लेक्‍टर्स बसवणे आवश्‍यक आहे, ती ठिकाणीही शोधण्यात आली आहेत. 

इथे हवेत रिफ्लेक्‍टर
कूपर कारखान्याजवळ देशमुख हाईट, शाहू मंडळ मैदान, बोगदा ते चैतन्य निवासी परिसरात चिंचेच्या झाडाजवळ, फुटका तलाव गणेशोत्सव मंदिराजवळील पूल, कोटेश्‍वर मंदिर ते शाहूपुरी रस्त्यावर मनाली डुप्लेक्‍स येथील पूल, कोटेश्‍वर पाण्याच्या टाकीजवळील पूल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ते काटदरे मसाला दुकान जाणाऱ्या रस्त्यावरील पार्किंग जवळचा पूल, शनिवार चौक ते बारटक्के चौक रस्त्यावर कच्छी किराणा स्टोअरकडील पूल, बुधवार नाका ते शाहूपुरी रस्त्यावर ईदगाह मैदान व आर्यांग्ल वैद्यकीय महाविद्यालय पुलाला, महानुभाव मठा शेजारील पूल, मोळाचा ओढा ते पोलिस चौकी समोरील पूल, महासैनिक भवनासमोरील पूल, करंजे येथील महालक्ष्मी शेजारील पूल, जुन्या उपप्रादेशिक चौकात शंकराच्या मंदिराजवळील पूल, राधिका सिग्नल ते राधिका टॉकीज रस्त्यावरील पूल, गोडोली चौक ते अजंठा चौक रस्त्यावर दरबार फर्निचरसमोर पूल, हॉटेल स्टेप ईन समोरील पूल, माने रुग्णालयासमोरील पूल, जिल्हा न्ययालयासमोरील पूल, गोडोली ते शिवराज तिकाटने रस्त्यावर हॉटेल पालवी, अक्षता मंगल कार्यालय, साक्षी एजन्सी व छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टापजवळील पूल, सदरबझार चौकी ते मोना स्कूल रस्त्यावरील मगरिबी दर्गा पूल, कॅप्टन शिंदे चौकीसमोरील पूल, शासकीय पुरुष भिक्षेकरी गृह शेजारील पुलावर रिफ्लेक्‍टर बसविण्याच्या सूचना वाहतूक आराखड्यात करण्यात आल्या आहेत. 

इथे हवेत रस्ता दुभाजक
पोवई नाका नो एन्ट्री गेट ते पोवई नाका मशिद गेट, पोवई नाका ते मुख्य बस स्थानक रस्त्यावर सभापती निवास ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचे प्रवेशद्वार, पोवई नाका ते कऱ्हाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर शालिनी व्हरायटीपर्यंत, पेढांरकर रुग्णालय ते राज मोबाईल शॉप, जिल्हा परिषद चौक ते कल्याणी रिक्षा स्टॉप, जिल्हा परिषद चौक ते शासकीय विश्रामगृह रस्त्यावर. करंजे परिसरात सरस्वती क्‍लास ते इंदलकर ट्रेडर्स, फायर ब्रिगेड कार्यालय ते प्रतीक क्‍लॉथ सेंटर, भू- विकास बॅंक ते करंजे रोड, भू- विकास बॅंक ते दोषी पेट्रोल पंप, जुने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते श्रीराम कुलकर्णी यांचा बंगला, जुने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रस्त्यावर शिवशक्ती सहकारी पतसंस्था ते त्रिपुटी दूध केंद्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते पोलिस परेड ग्राऊंड रस्त्यावर चव्हाण बंगला ते महिलांचे वसतिगृह, छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय ते शिवराज ऑप्टिकल याठिकाणी सुरळित वाहतुकीसाठी रस्ता दुभाजक बसविणे आवश्‍यक असल्याचे आराखड्यात आहे.

इथे हवेत स्पीड ब्रेकर्स 
भरधाव वेगात बेभानपणे गाडी चालविणाऱ्यांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होतो. अनेक अपघातही घडले आहेत. त्यामुळे शहरातील वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहण्यासाठी
कऱ्हाड रस्त्यावर भारती बॅंकेसमोर, मंजू इन्स्टिट्यूटसमोर, अजंठा चौकात रॉयल प्लाझा इमारती समोर, शिवराज चौकात हॉटेल मराठासमोर, जिल्हा परिषद चौकात लकी प्लाझा इमारतीसमोर, जिल्हा परिषद कार्यालयासमोर, धनंजयराव गाडगीळ, आझाद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर, जिल्हा रुग्णालय रस्त्यावर सेंट पॉल स्कूलसमोर, भीमाबाई आंबेडकर शाळेसमोर शाहू चौक ते पोवई नाका रस्त्यावर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर, शाही मशीद, कन्याशाळा, सयाजीराव हायस्कूल, निवासी- अनिवासी गुरुकुल प्रकल्प, कला व वाणिज्य महाविद्यालयाजवळ त्रिमूर्ती जनरल स्टोअर्स याठिकाणी रस्ता दुभाजक करण्याची गरज आहे.

Web Title: speed breaker, devider, reflector study