उजनीच्या नियोजनावरून नगरसेवकांत तू...तू...मैं...मैं...

उजनीच्या नियोजनावरून नगरसेवकांत तू...तू...मैं...मैं...

सोलापूर- उजनी धरणातील पाण्याच्या नियोजनावरून नगरसेवकांत तू..तू...मैं..मैं सुरू झाले आहे. सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. पालकमंत्र्यांनी पूजनापेक्षा नियोजनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी बसपच्या नगरसेवकांनी केला आहे. तर नेहमीच दिशाभूल करणाऱ्या नगरसेवकांना पालकमंत्र्यांची विकासकामे दिसत नाही, असा प्रतिटोला भाजपच्या नगरसेवकांनी लगावला आहे. 

उजनी धरण 100 टक्के भरल्यानिमित्त पालकमंत्री विजय देशमुख यांनी धरण परिसरात जलपूजन केले. त्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, या दौऱ्यात भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांचा भरणा जास्त होता. विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यासह कॉंग्रेसचे चेतन नरोटे, बसपचे आनंद चंदनशिवे यांनी दौऱ्यात सहभाग घेतला नाही. 

धरण 100 टक्के भरल्याने शहरवासीयांना रोज पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याऐवजी पुण्यात झालेल्या पावसामुळे भरलेल्या धरणातील पाण्याचे पूजन करून, आपल्या कर्तृत्वामुळेच हे झाले असा दिखावा करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी चालविल्याचा टोला चंदनशिवे यांनी लगावला.

भाजपचे विनायक वीटकर यांनी चंदनशिवे यांच्या आक्षेपाला विरोध करीत, राजकीय द्वेषापोटी जलपूजनास विरोध करणाऱ्या संकुचित विचारसरणीचा जाहीर निषेध म्हणत पालकमंत्र्यांच्या समर्थनार्थ मत व्यक्त केले आहे. संपूर्ण सोलापुरात दररोज पाणीपुरवठा करण्याविषयी सध्या नियोजन चालू आहे. दिशाभूल करणाऱ्या नगरसेवकांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, असाही प्रतिटोला त्यांनी लगावला. 

पालकमंत्री विरोधक म्हणतात....
सोशल मीडियावरील आरोप- प्रत्यारोप 
-विकास करण्याऐवजी विकास अडविण्याचे काम केले. 
-प्लास्टिक पाइपलाइन दुरुस्ती करण्यात नगरसेवकांचा वेळ 
- लोकसहभागामुळे सोलापूर स्मार्ट सिटी, पालकमंत्र्यांमुळे नाही 
-सहकाऱ्यांना सोडचिठ्ठी देणाऱ्या गट बदलू पालकमंत्र्यांनी आमदारकीची स्वप्ने पाहू नयेत. 
- पालकमंत्री-पुत्राची हुजरेगिरी करणाऱ्या नगरसेवकाला कोणती उपमा द्यावी ? 

पालकमंत्री समर्थक म्हणतात...
- शासकीय योजनांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी पालकमंत्र्यांचे प्रयत्न 
- रोज पाणीपुरवठ्यासाठी सातत्याने प्रयत्न लवकरच येणार यश 
- स्मार्ट सिटीसाठी पालकमंत्र्यांचे मोठे योगदान 
- पालकमंत्री मतदारांच्या हृदयात आहेत, तेच अधिराज्य गाजविणार 
- बिनडोक नगरसेवकांना काही दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com