‘साईनाथ’च्या संचालकांना आठ वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

सांगली - ठेवीदारांच्या ठेवी परत दिल्या नाहीत म्हणून ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीवरून ग्राहक न्यायालयाने श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, त्यांच्या पत्नी विभावरी कुलकर्णी यांच्यासह नऊ जणांना ग्राहक न्यायालयाने एकूण आठ वर्षे शिक्षा सुनावली. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष ए. ए. खडसे यांनी आज हा निकाल दिला. चार ठेवीदारांनी याबाबत ग्राहक न्यायालयात तक्रार केली होती. त्यांना प्रत्येकी दोन लाख ८० हजार रुपये भरपाई  देण्याचे आदेश न्यायालयाने संचालकांना दिले आहेत. 

ग्राहक न्यायालयाच्या निकालानुसार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, विभावरी धनंजय कुलकर्णी, शालिनी बाळासाहेब पाटील, कुसुम चंद्रकांत नवले, मीना अनिल हेबळीकर, मेघा भास्कर कुलकर्णी, सुनंदा  धुळाप्पा बणजवाड,  चारुता चंद्रशेखर चिंचोरे, स्मिता प्रदीप मोहिते अशी शिक्षा झालेल्या संचालकांची नावे आहेत. त्यांची प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली आहे.

विश्रामबाग येथे श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेने २००८ मध्ये ठेवी परत दिल्या नाहीत म्हणून शांतगौंडा कलगौंडा पाटील, रुद्राप्पा जिऱ्याप्पा कट्टेगिरी, विमल बाळासाहेब चौगुले, बापूराव बाळू चौगुले या चार ठेवीदारांनी न्यायालयात स्वतंत्रपणे तक्रार दिली होती. न्यायालयाने २००८ मध्ये शांतगौंडा पाटील, रुद्राप्पा कट्टेगिरी यांच्या बाजूने तर सन २०१० ला विमल चौगुले आणि बापूराव चौगुले यांच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र न्यायालयाने ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचे आदेश देवूनही पतसंस्थेने ठेवी परत दिल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्यामुळे संचालकांना शिक्षा करण्याची मागणी या ठेवीदारांनी न्यायालयाकडे केली.

पतसंस्थेला ४० हजारांचा दंड
नऊ जणांना प्रत्येक प्रकरणामध्ये प्रत्येकी दोन वर्षे अशी आठ वर्षे शिक्षा  न्यायालयाने संस्थापक धनंजय कुलकर्णी यांच्यासह आठ संचालकांना सुनावली. तसेच संचालकांनी चारही ठेवीदारांना प्रत्येकी दोन लाख ८० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. शिवाय संस्थेला ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला. वरील न्यायालयात अपील करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या जामिनावर संचालकांची सुटका केली.

Web Title: Sri Sainath Mahila Nagari Co-operative Credit Society founder eight years Punishment

टॅग्स