कुटुंबाला बहिष्कृत करणाऱ्या नऊ पंचांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

श्रीगोंदे - पोलिसांत तक्रार व न्यायालयात दावा दाखल केल्याचा राग येऊन पाबळ फाटा (ता. शिरूर) येथील रामदास मोरे व त्यांच्या कुटुंबीयांना समाजातून बहिष्कृत केल्याच्या गुन्ह्यात जोशी समाजाच्या अकरा पंचांविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांच्या मुलीचा विवाह काष्टी येथे झाला. तिला सासरी त्रास होत होता. पंचांकडे न्याय न मिळाल्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नगर येथील न्यायालयात दावा दाखल केला. याचा राग येऊन पंच बापू भोसले, नाना वायकर, शाहू सोनवणे, अभिमान चित्रे, तात्या सोनवणे, ज्ञानेश्वर भोसले, मच्छिंद्र इगवे, महादेव वायकर, बिभीषण दोरकर, सनी सूर्यवंशी, वसंत वायकर (सर्व रा. काष्टी) यांनी पत्रक काढून समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून न घेण्याचे कळविले. त्यामुळे आम्हाला समाजातील कुठल्याही कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नव्हते. माझ्या वडिलांचे निधन झाले त्या वेळी आमच्या समाजाचे कुणीही आले नव्हते. या अन्यायामुळे आमचे मनोधैर्य खचले आहे.

दरम्यान, पंच दोरकर व सूर्यवंशी वगळता अन्य सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: srigonde nagar news nine punch arrested