दहावी गुणवंतांचा उद्या कौतुक सोहळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

कोल्हापूर - ‘सकाळ’तर्फे दहावीत ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंतांचा कौतुक सोहळा शुक्रवारी (ता. १५) दुपारी चारला होणार आहे. डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवनात हा कार्यक्रम होणार आहे.महेश ट्युटोरियल्स मुख्य प्रायोजक आहेत. 

दरम्यान, कार्यक्रमात ‘विज्ञान प्रवेशप्रक्रिया आणि भविष्यातील संधी’ या विषयावर महेश ट्युटोरियल्सचे उपाध्यक्ष सुरेंद्र सिंग, ‘वाणिज्य शाखेतील करिअर’ या विषयावर वाणिज्यचे विभागप्रमुख सीए राघवेंद्र बकरे मार्गदर्शन करणार आहेत.

दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना परिस्थितीअभावी पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’ने समाजातील दातृत्वाला आवाहन केले. त्यातून अनेक विद्यार्थी आजवर उच्चशिक्षित झाले आहेत. यंदा दहावीत ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा होणार असून, त्यांच्या जिद्दीला सलाम केला जाईल. महेश ट्युटोरियलतर्फे पाच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाणिज्य व विज्ञान शाखेत बारावीपर्यंतच्या क्‍लासची सुविधा विनामूल्य दिली जाणार आहे. विज्ञान शाखेच्या तीन व वाणिज्य शाखेच्या दोन विद्यार्थ्यांचा त्यात समावेश असेल.

गुणपत्रिका सादर करा
विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकांची झेरॉक्‍स ‘सकाळ’च्या शिवाजी उद्यमनगर येथील मुख्य कार्यालयात किंवा महेश ट्युटोरियल्स (सासने मैदानासमोर व राजारामपुरी जनता बझारजवळ) येथे सादर करायची आहे. सर्व सत्कारप्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र दिले जाईल. बाहेरील गावचे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी गुणपत्रिका घेऊन येऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क - सूरज जमादार - ९५५२५८१९१८, विजय शिंदे - ९९२२४१६०५५.

Web Title: SSC cleaver student homage ceremony