सांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली आहे. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ पलटी झाली आहे. समोरील दुचाकीस्वाराला चुकविताना एसटीवरील ताबा सुटून ही घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 40 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 

सांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील दुचाकीस्वाराला चुकविताना एसटीवरील ताबा सुटून ही घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 40 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. 

अपघातानंतर स्थानिक आणि वाहन धारकांनी तातडीने धाव घेऊन सर्व प्रवाशांना बसमधून काढले. घटनेची माहिती समजताच सांगली पोलीस आणि अत्यावश्यक यंत्रणा दाखल झाली असून जखमी प्रवाशांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे.

Web Title: ST accident on Sangali Malkapur Road