नागजला एसटी बस अचानक पेटून खाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

ढालगाव - नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे रत्नागिरी-नागपूर महामार्गावर पंढरपूरला शिवसेनेच्या सभेहून कार्यकर्ते घेऊन येणाऱ्या बसला आग लागली. बसमध्ये ४२ कार्यकर्ते होते. कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र बसचे मोठे नुकसान झाले. कार्यकर्त्यांचे साहित्य जळून खाक झाले.

नागज फाट्यापासून काही अंतरावर शिवकृपा पेट्रोल पंपासमोर गारगोटी डेपोची बस (एमएच.१४ बीटी ७२८) सकाळी गारगोटीहून पंढरपूरला शिवसेनेच्या सभेसाठी गेली होती. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा होती. सभा व चंद्रभागेची महाआरती करून  शिवसैनिक गारगोटी (जि. कोल्हापूर) कडे निघाले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास शिवकृपा पेट्रोल पंपासमोर बसने अचानक पेट घेतला. एकच धावपळ उडाली. सर्व कार्यकर्त्यांनी गाडीतून खाली उतरत जीव वाचवले. त्याचे सर्व साहित्य मात्र जळाले.

Web Title: ST Bus Burn in Nagaj