एसटीचा कंडक्टर दारूच्या नशेत.. प्रवाशांचा फुकट प्रवास

bus
bus

श्रीगोंदे - सकाळी आठची वेळ.. श्रीगोंदे ते नगर या एसटीत प्रवासी चढले. गाडीत जवळपास ऐंशी प्रवासी बसले होते. पुढे गेले आणि नशेत तर्रर असलेल्या कंडक्टरचे चाळे समोर आले. भल्या सकाळचे हे दृश्य पाहून प्रवाशांनी डोक्याला हात लावला. तळीराम कंडक्टरला प्रवाशांचे तिकीट काढण्याचेही लक्षात आले नाही आणि अनेकांनी या मार्गावर फुकट प्रवास केला. सदर कंडक्टर मद्यपी असल्याच्या वृत्ताला आगारप्रमुखांनी दुजोरा दिला.

सकाळी आठच्या सुमारास श्रीगोंदे बसस्थानकावरुन नगरला जाणाऱ्या एसटीत प्रवासी बसले. बस थोड्या अंतरावर गेल्यानंतर प्रवाशांच्या लक्षात आले की कंडक्टर महाशय भल्या सकाळीच नशा करुन नोकरीला आले आहेत. त्याची प्रवाशांशी हुज्जत सुरु झाली. सदर कंडक्टरला जागेवरुन नीट उठताही येत नव्हते. कसेबसे उठले तर  झोंकाडी जात असल्याने महिला प्रवाशांना त्रास होत होता. कोळगावच्या पुढे गाडी गेली आणि नशेत तर्रर असणाऱ्या कंडक्टरला जागेवरुन उठताच न आल्याने तेथून पुढचा प्रवास प्रवाशांना फुकटच मिळाला. गाडीत असणारे व्यापारी संजय मुथा यांनी ही बाब माध्यमांच्या लक्षात आणून देताना किमान सदर वाहकाला नगरमध्येच उतरुन घेण्याची विनवणी केली.

आगारप्रमुख प्रविण शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करतो असे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या चौकशीपर्यंत गाडी नगरवरुन फिरली. याबाबत शिंदे म्हणाले, सदर कंडक्टर हा मद्यपान केलेल्या अवस्थेत होता. त्याला आता यापुढे कुठलीही फेरी दिली जाणार नसून, कारवाईबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com