लोकशाहीच्या उत्सवासाठी साडेदहा हजार लालपरी

तात्या लांडगे
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातील 31 विभागातून दहा 500 बसचे नियोजन करण्यात आले आहे. 20 व 21 ऑक्‍टोबरदरम्यान हे नियोजन आहे परंतु, त्यामुळे वाहतूक सुरळीतच राहील. सोलापूर जिल्ह्यासाठी एक हजार 341 तर नाशिकसाठी 509 आणि पुण्यासाठी 809 बसचे नियोजन असून त्यातून राज्य परिवहन महामंडळाला सुमारे 12 ते 15 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.
- राहूल तोरो, महाव्यस्थापक, वाहतूक, राज्य परिवहन महामंडळ

सोलापूर : लोकशाहीच्या उत्सवानिमित्त राज्य परिवहन महामंडळाची तयारी पूर्ण झाली असून यंदा विधानसभा निवडणुकीसाठी दहा हजार 500 बसचे नियोजन करण्यात आले आहे.

उद्या (रविवारी) सकाळी अधिकारी, कर्मचारी अन्‌ ईव्हिएम, व्हिव्हिपॅट यंत्रे घेऊन लालपरी संबंधित मतदान केंद्रांवर जाणार आहे. त्यानंतर 21 ऑक्‍टोबरला (सोमवारी) मतदानानंतर तेथून निघणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ असून त्याठिकाणी सर्वाधिक एक हजार 341 तर पुण्यासाठी 809 बसचे नियोजन करण्यात आले आहे. तर नाशिकसाठी 509 बस सोडल्या जाणार आहेत.

उद्या (रविवारी) सुट्टी असल्याने आणि मतदाना दिवशीही सुट्टी जाहीर करण्यात आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाही, याची दक्षता राज्य परिवहन महामंडळाने घेतली आहे. प्रवाशांची संख्या सर्वाधिक असलेल्या ठिकाणी बस सोडण्याचेही नियोजन करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक राहूल तोरो यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

ठळक बाबी...
- विधानसभेसाठी राज्यभरात ईव्हिएम व अधिकारी, कर्मचारी वाहतुकीसाठी साडेदहा हजार बस
- सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक एक हजार 341 बस
- 20 ऑक्‍टोबरला सकाळी निघालेल्या बस 21 ऑक्‍टोबरला मतदान झाल्यावर निघणार बस
- रविवारी (ता.20) शाळा बंद अन्‌ सोमवारी (ता.21) मतदानाची सुट्टी असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील
- निवडणुकीसाठी वापरलेल्या बसमधून परिवहन महामंडळाला मिळतील 15 कोटींपर्यंत उत्पन्न

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातील 31 विभागातून दहा 500 बसचे नियोजन करण्यात आले आहे. 20 व 21 ऑक्‍टोबरदरम्यान हे नियोजन आहे परंतु, त्यामुळे वाहतूक सुरळीतच राहील. सोलापूर जिल्ह्यासाठी एक हजार 341 तर नाशिकसाठी 509 आणि पुण्यासाठी 809 बसचे नियोजन असून त्यातून राज्य परिवहन महामंडळाला सुमारे 12 ते 15 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे.
- राहूल तोरो, महाव्यस्थापक, वाहतूक, राज्य परिवहन महामंडळ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST buses use for Maharashtra Vidhan Sabha 2019

टॅग्स