राज्य परिवहन कर्मचाऱ्यांची आता आरपारची लढाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

राज्य परिवहन कर्मचारी कृती समितीच्या बैठकीत संपाची चर्चा
तात्या लांडगे
सोलापूर: राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांनुसार राज्य सरकारने सकारात्मक तोडगा न काढल्यास राज्यातील सर्व कर्मचारी संघटनांच्यावतीने संप पुकारला जाईल आणि जोवर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर तो सुरूच ठेवण्यात येईल, असा निर्णय तळेगाव दाभाडे येथे झालेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आला.

या बैठकीला राज्य परिवहन कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी आत्तापर्यंत प्रशासनाबरोबर पगारवाढ या विषयावर झालेल्या सर्व बैठकांचा तपशील मांडला. तसेच पुढील वाटचालीबद्दलच्या ध्येय-धोरणावर चर्चा करण्यात आली.

मान्यताप्राप्त कामगार संघटना कर्मचाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असून आता मागण्या मान्य होईपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवावी, सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा स्वीकार करु नये. शासन आणि राज्य परिवहन कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी यांच्यात दोन दिवसात बैठक होणार असून त्या बैठकीत कामगार हिताचा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर संपाबाबत अंतिम निर्णय शुक्रवार, 18 मे रोजी मुंबईत होणाऱ्या कृती समितीच्या बैठकीत होईल, असे या बैठकीद्वारे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

शासनाने मूळवेतन×2.41 वाढ तसेच भत्ते स्वरूपात अनुषांगिक वाढ चार ते सहा हजारांपर्यंत, असे दोन प्रस्ताव कर्मचारी संघटनांसमोर ठेवले आहेत. परंतु, या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांना सन 2020 पर्यंतच लाभ मिळणार आहे. त्यामुळे तो प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे. सरकारने पगारवाढीचा एकतर्फी निर्णय घेतल्यास कामगार आरपारची लढाई करुन ऐतिहासिक आंदोलन करतील.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी संघटना

Web Title: st employee Battle of the Alliance