एसटी कामगारांच्या अधिवेशनाची तयारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

सांगली - एस. टी. कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन २३ व २४ एप्रिल रोजी  चंदनवाडी (मिरज) येथे होत आहे. अधिवेशनाची तयारी जोमात सुरू आहे. सुमारे ७५ हजार (३०० बाय २५०) चौरस फुटांचा मंडप उभारला जात आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस अधिवेशन आहे, अशी माहिती विभागीय सचिव विलासराव यादव, विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे, कार्याध्यक्ष  शमु मुल्ला, एस. टी. बॅंकेचे संचालक नारायण सूर्यवंशी यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘सुमारे पन्नास हजार एस. टी. कामगार राज्यभरातून अधिवेशनसाठी येणार आहेत. गोंदिया ते सिंधुदुर्ग अशा राज्याच्या सर्व भागातून अधिवेशनासाठी लोक येणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, सांगली जिल्ह्यातील आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर आदी उपस्थित राहणार आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘सांगली विभागातर्फे स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. तर ॲड. के. डी. शिंदे यांनी लिहिलेल्या ‘साथी बिराज साळुंखे वन मॅन आर्मी’ या पुस्तकाचे प्रकाशनही याच अधिवेशनात होणार आहे. शासनाच्या सेवेत सामावून घ्या, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे वेतन द्या, आदी मागण्यांसह विविध ठराव मांडले जाणार आहेत. विविध मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.’’ 

Web Title: st employee session preparation