एसटी कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत

तात्या लांडगे
बुधवार, 20 जून 2018

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाल्याच्या कारणास्तव चालक आणि वाहक व सहायक व अनुकंप तत्वावरील 1100 कामगारांना सेवामुक्‍त करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरील कारवाई थांबवा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सचिव हणुमंत ताटे यांनी दिला आहे. 

सोलापूर: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाल्याच्या कारणास्तव चालक आणि वाहक व सहायक व अनुकंप तत्वावरील 1100 कामगारांना सेवामुक्‍त करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरील कारवाई थांबवा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सचिव हणुमंत ताटे यांनी दिला आहे. 

कोणत्याही कर्मचाऱ्याला तडकाफडकी सेवामुक्‍ती करु नये या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळामध्ये शिस्त व अपील कार्यपध्दतीचे नियम ठरलेले आहेत. त्यानुसार महामंडळाने कार्यवाही करण्याचे बंधन आहे. तरीही त्या नियमांचा भंग करून त्या कर्मचाऱ्यांना कोणतीही शहानिशा न करता थेट सेवामुक्‍तीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. प्रशासनाची ही कृती नियमबाह्य असून त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. या कारवाईविरोधात असंतोष निर्माण होऊन औद्योगिक शांतता भंग होण्याची शक्‍यता आहे.

परिवहनमंत्र्यांनी घोषणा करूनही प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे श्री. ताटे यांनी सांगितले. प्रशासनाने कर्मचारीविरोधी कारवाई थांबवावी अन्यथा राज्य परिवहन कर्मचारी पुन्हा संप करतील, तसेच याविरोधात न्यायालयातही दाद मागितली जाईल, असे ताटे यांनी स्पष्ट केले.

Web Title: ST employees begin the strike again