नगर - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

नगर : पगार वाढ व इतर प्रलंबित मागण्यांसाठी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून अचानक संप सुरू केला या संपात शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे कार्यकर्ते मात्र सहभागी झालेले नाहीत त्यामुळे जिल्ह्यात महामंडळाची सेवा अंशतः सुरू आहे. अचानक संपामुळे प्रवाशांची मात्र हाल होत आहेत.

ती महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार वाढ अनेक वर्षापासून प्रलंबित होती त्यासाठी दोन वेळा एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप केला होता प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचारी संघटनांची वेळोवेळी बैठकाही घेतल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना सुमारे बारा हजार रुपयांपर्यंत पगार वाढ देण्याचे मान्य करण्यात आली मात्र प्रत्यक्षात चार हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळाल्याचे कारण देत हिस्ट्री कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे या संपामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शिवसेनेचे वाहतूक सेनेचे कार्यकर्ते मात्र संपावर गेली नसल्याने एस टी सेवा अंशतः सुरू आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

Web Title: st employees on strike in nagar