‘एसटी’तील रिक्त पदे लवकरच भरणार - रावते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - राज्य परिवहन (एसटी) महामंडळात तीन हजार रिक्त जागा आहेत. त्यामुळे सध्या प्रवासी सेवेवरील ताण विचारात घेता भविष्यात या जागा लवकर भरण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी त्यांनी केलेल्या बसस्थानक पाहणीत ऑईल मापातील घोळ उघडकीस आला. 

शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी श्री. रावते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली. तसेच राज्य परिवहन महामंडळाचे नियमित व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. रावते म्हणाले की, अनेक आगारांत कर्मचाऱ्यांच्या, विशेषतः चालक-वाहकांच्या ड्युट्या लावण्याबाबत अनेक तक्रारी येतात, कर्मचारी नाराज होतात. असे प्रकार टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या ऑनलाईन करण्यावर भर देण्यात येईल. त्यासाठी योग्य त्या तांत्रिक सुविधा उपलब्ध करून ड्युट्या ऑनलाईन लावण्यात येतील.

ते म्हणाले की, महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सेवा देऊन महामंडळाचा लौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. ज्यांना वेतनवाढ मान्य नाही, त्यांनी स्वतः विचार करावा. 
महामंडळाच्या शिवशाही गाड्यांची सेवा, त्यातून अलीकडे झालेले अपघात या विषयांवर विचारले असता त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत शिवशाही गाड्यांची सेवाही चांगलीच सेवा आहे, असे मोजकेच उत्तर दिले.   
  
मंत्री रावतेंनी हेरला ऑईल मापाचा घोळ   
श्री. रावते यांनी बसस्थानक परिसराची पाहणी करताना मागील बाजूस असलेले आगार, तेथील कार्यशाळा व शेजारचा पेट्रोलपंप पाहिला. तेथील मापे पाहिली. ज्या मापातून अर्धा लिटर ऑईल गाडीत घालावे लागते, तेथे एक लिटरचे माप वापरले जाते. त्यामुळे अर्धा लिटरऐवजी जादा ऑईल प्रत्येक गाडीत जाऊ शकते, यातून एसटीचे नुकसान होऊ शकते, काटेकोर माप वापरले गेले, तर एसटीच्या खर्चात बचत होऊ शकते, मापातील फरक त्यांनी तत्काळ हेरला. संबंधित अधिकाऱ्यांना ऑईलची मापे काटेकोर वापरावीत, अशा सूचना दिल्या. तेव्हा सारेच अवाक्‌ झाले.

Web Title: ST Empty Post Recruitment Diwakar Raote