एसटी च्या धडके वृद्ध महिला ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

कऱ्हाड : येथील बसस्थानकावर एसटी मागे घेताना एसटीची धडक बसल्याने सातारा येथील वृद्ध महिला ठार झाली. खुर्शिद अब्दुल हमीद शेख (वय 73, रा. सातारा) असे संबधित महिलेचे नाव आहे. सकाळी अकराच्या सुमारास बसस्थानकात ही दुर्दैवी दुर्घटना घडली. सायंकाळी चारच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले, असे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अपघात विभागाचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बस स्थानकात कऱ्हाड ते ढेबेवाडी ते जिंतीला जाणारी एसटीचे चालक एसटी मागे घेत होते. एसटीची खुर्शिद शेख यांना धडक बसली. एसटी व संरक्षक भिंतीच्या मध्ये त्या सापडल्याने शेख गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारास खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होते. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हवालदार खलील इनामदार व प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

Web Title: ST hits old women