"एसटीने पूर्ववत दराने तिकिटे द्यावीत'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

राशिवडे बुद्रुक - रंकाळा चौपाटीवरील कामासाठी रस्ता बंद काळात एसटी वाहतूक अंबाई टॅंककडून सुरू होती. यामुळे एसटीने प्रवाशांना अर्धा स्टेजचा अधिक आकार आकारला होता. तो तातडीने रद्द करून पूर्ववत कमी दराने तिकिटे द्यावीत, असे निवेदन राशिवडे व्यापारी असोशिएशनने विभागीय वाहतूक नियंत्रकांना दिले आहे. निवेदनातील आशय असा :  राशिवडेमार्गे व भोगावतीमार्गे राधानगरी परिसराकडे जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या रंकाळा चौपाटीवरून ये-जा करतात; मात्र या चौपाटीच्या मार्गाचे दुरुस्तीकरण चार वर्षांपासून सुरू असल्याने या मार्गावरील गाड्या रंकाळा तलावाला वळसा घालून अंबाई जलतरण तलावापासून निघत होत्या.

राशिवडे बुद्रुक - रंकाळा चौपाटीवरील कामासाठी रस्ता बंद काळात एसटी वाहतूक अंबाई टॅंककडून सुरू होती. यामुळे एसटीने प्रवाशांना अर्धा स्टेजचा अधिक आकार आकारला होता. तो तातडीने रद्द करून पूर्ववत कमी दराने तिकिटे द्यावीत, असे निवेदन राशिवडे व्यापारी असोशिएशनने विभागीय वाहतूक नियंत्रकांना दिले आहे. निवेदनातील आशय असा :  राशिवडेमार्गे व भोगावतीमार्गे राधानगरी परिसराकडे जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या रंकाळा चौपाटीवरून ये-जा करतात; मात्र या चौपाटीच्या मार्गाचे दुरुस्तीकरण चार वर्षांपासून सुरू असल्याने या मार्गावरील गाड्या रंकाळा तलावाला वळसा घालून अंबाई जलतरण तलावापासून निघत होत्या. हा मार्ग दूरचा असल्याच्या कारणाने राधानगरी व संभाजीनगर आगाराने अर्धा स्टेजचा अधिक आकार लावला होता. आता रंकाळा रस्त्याचे काम पूर्ण होऊन त्यावरून एसटीची वाहतूकही सुरू झाली तरीही या खात्याने वाढीव दर कमी केलेले नाहीत. हा नाहक भुर्दंड असून तातडीने वाढीव आकार कमी करून प्रवाशांना कमी दराची तिकिटे द्यावीत, अशी मागणी केली आहे.

शिवाय एसटीच्या अनेक गाड्या नादुरुस्त असल्याने धोकादायक स्थितीत प्रवास सुरू आहे. राशिवडे येथून जाणाऱ्या अनेक गाड्या बाहेरच्या मार्गाने जातात. त्यांचे थांबे निश्‍चित नसतात. याचाही प्रवाशांना त्रास होतो. याबाबत निर्णय घ्यावा, असेही म्हटले आहे. निवेदनावर अध्यक्ष रामचंद्र तापेकर, उपाध्यक्ष सदानंद गुंडाळे यांच्या सह्या आहेत.

Web Title: ST should charge old fares