अक्कलकोट आगारात संपामुळे पसरली शांतता

राजशेखर चौधरी
शनिवार, 9 जून 2018

अक्कलकोट - परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी असंतोष व्यक्त करत ही वेतन श्रेणी योग्य नसल्याचे स्पष्ट करीत गुरुवारी रात्रीपासून अघोषित
संप पुकारला आहे. या संपाला अक्कलकोट आगारांतील कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे पाठिंबा देत हा बंद शंभर टक्के यशस्वी केला आहे. 

दुसऱ्या दिवशीही अक्कलकोट स्थानकात तुरळक संप माहीत नसलेल्या प्रवास्यांची ये जा वगळता स्थानक सामसूम दिसत आहे. या संपात अक्कलकोट आगारामधून १४३ चालक,१४० वाहक,५७ कार्यशाळा कर्मचारी आणि ३४ अडमिन असे ३७४ कर्मचारी सहभागी झाले आहे यामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. हा संप अचानक पुकारण्यात आल्यामुळे प्रवाशांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे. यामुळे अक्कलकोट बसस्थानकात लांब पल्ल्याचे प्रवाशी अडकून पडले आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून एकही गाडी रस्त्यावर धावली नाही. यामुळे पेपर सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी दूध पोचले नाही. 

करारानुसार देण्यात येणारी वेतनवाढ ही मागणीपेक्षा कमी असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये 
राग व्यक्त होत आहे. याबाबत एसटी महामंडळातील कोणत्याही अधिकृत कामगार संघटनेने संपाची हाक दिलेली नाही. तरीही कामगारांनी स्वयंस्फूर्तीने काम बंद आंदोलन पुकारल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा संप किती काळ असणारा याबाबत मात्र माहिती देण्यात आली नाही. गुरुवार पासून सोशल मीडियात या संपाबाबत मेसेजमुळे व्हायरल होत होते. मात्र हा संप कोणी पुकारला याचा त्यावर उल्लेख नव्हता. 

याबाबत काही संघटनाच्या प्रतिनिधीशी विचारले असता ते म्हणाले की, सातवा वेतन आयोग लागू करा, पदनिहाय वेतनश्रेणी द्या, जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना २५ टक्के हंगामी वाढ द्या अशा प्रमुख मागण्या आहेत. इतर राज्यातील चालक आणि वाहकांना दीड हजार ते दोन हजार रुपये ग्रेड पे दिला जातो.तोही महाराष्ट्रात मिळत नाही. ही देखील एक महत्त्वाची मागणी आहे. या सगळ्या मागण्यांकडे परिवहनमंत्री आणि सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा संप पुकारण्यात आला आहे.

Web Title: st strike in akkalkot aagar