एसटी कामगारांचे महाअधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मिरजेत आजपासून आयोजन - ‘सातवा वेतन’ लागू करण्याची मागणी 
सांगली - महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे  ५३ वे राज्यव्यापी महाअधिवेशन उद्या (ता.२३) सकाळी अकरा वाजता मिरज-सांगली रस्त्यावरील विभागीय कार्यशाळेजवळ होणार आहे. कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी हे अधिवेशन होत आहे.

राज्यभरातून चाळीस हजार कामगार उपस्थित रहाणार असल्याची माहिती अध्यक्ष संदीप शिंदे, मुख्य सचिव हनुमंत ताटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘कामगारांच्या वेतन वाढीसाठी संघटनेने गेल्या वर्षी व्यवस्थापनाकडे मागणी केली. तसा प्रस्तावही सादर केला होता. त्यात एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू कराव्यात, अशी मागणी होती. आयोग लागू होईपर्यंत २५ टक्के अंतरिम वाढ लागू करावी, महामंडळ राज्य शासनात विलीन करावे, कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, कामगार करारातील वेतन तफावती दूर कराव्यात, अशी मागणी होती. त्यावर प्रशासनाने आयोग लागू करता येत नाही, असा खुलासा केला. हेच संघटनेला मान्य नाही. म्हणून राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. पूर्वी वेतन करार त्या त्या वेळच्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसारच केली आहेत. शासन मात्र महामंडळाच्या आर्थिक स्थितीचे कारण पुढे करून चालढकलपणा करते आहे. अधिवेशनातही हाच मुद्दा मांडण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. 

यावेळी कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, राजू शेट्टी, महापौर हारुण शिकलगार आदी उपस्थित राहणार आहेत.’’ यावेळी कामगार नेते बिराज साळुंखे, विभागीय सचिव विलास यादव उपस्थित होते.

..तर बेमुदत संप
अध्यक्ष संदीप शिंदे आणि सचिव हनुमंत ताटे म्हणाले, ‘‘कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी संघटना झटते आहे, मात्र महामंडळाच्या प्रसिद्धी विभागाकडून चुकीची माहिती देऊन कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील एक लाख पाच हजार कामगारांच्या पोटाचा प्रश्‍न आहे,  यासाठी वेतनवाढीची मागणी तडीस नेऊ. मागण्या मान्य  न झाल्यास राज्यव्यापी बेमुदत संप घोषित केला जाईल.’’

परिवहन मंत्र्यांचीच संघटना 
महाअधिवेशनासाठी परिवहन मंत्री उपस्थित का राहणार नाहीत, असा सवाल आयोजकांना करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘परिवहन मंत्र्यांना प्रत्येवळी  आमंत्रण दिले जाते, परंतु त्यांची स्वतःची संघटना असल्याने ते येत नाहीत. परिवहन मंत्री हे केवळ एकाच संघटनेचे नसून सर्वांचे आहेत, इतके तरी गांभीर्य असायला हवे.’’

Web Title: st worker maha session