
ST Worker News : सुट्टी नाकारल्याने पत्नीचं आंदोलन; आता एसटी प्रशासनाकडून पतीचं निलंबन, कारण…
पतीला सुट्टी दिली नाही म्हणून एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने चक्क एसटी आगारातच आंदोलन केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सांगलीच्या आटपाडी येथील एसटी आगार प्रमुखांच्या केबिनसमोर झोपून महिलेने आंदोलन केलं होतो. हे आंदोलन चांगलचं गाजलं. मात्र आता या एसटी कर्मचाऱ्यालाच निलंबित करण्यात आलं आहे.
पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारला गेला, त्यानंतर सांगलीच्या आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगारप्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन सुरू केलं आहे. हे अनोख आंदोलन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले होते. विलास कदम असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते गेल्या 33 वर्षांपासून राज्य परिवहन मंडळामध्ये चालक पदावर कार्यरत आहेत. ते 70 दिवसांनी निवृत्त होणार होणार आहेत.
नेमकं काय झालं?
मात्र आता एसटी प्रशासनाकडून एसटी चालक कदम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विलास कदम यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. एसटी चालवत असताना मोबाईलवर बोलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एसटी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
पुढील आदेश येईपर्यंत कदम यांनी रोज सकाळी दहा वाजता एसटी आगारात येऊन हजेरी लावून, कार्यालयीन वेळेत एसटी आगार प्रमुखाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाऊ नये, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.