बेळगाव : दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीला कात्रीने भोसकले

पतीने पत्नीच्या पोटात चार वेळा कात्रीने भोसकून खून करण्याचा प्रयत्न
crime news updates
crime news updatessakal

बेळगाव : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या पोटात चार वेळा मोठी कात्रीने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. यल्लव्वा सिद्धाप्पा कारण्णावर (वय ३५ मूळ, रा. राजकट्टी ता. हुक्केरी सध्या रा. जनता प्लॉट होनगा) असे जखमीचे नाव असून याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सिद्धाप्पा सत्याप्पा कारण्णावर (वय ३६) असे हल्लेखोर पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे दांपत्य मूळचे राजकट्टी ता. हुक्केरी येथील असून कामानिमित्त गेल्या काही वर्षापासून जनता प्लॉट होनगा येथे वास्तव्यास आहेत. सिद्धाप्पा हा हमाली काम करत होता. तसेच त्याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन देखील होते. त्यामुळे तो दारूच्या नशेत वारंवार पत्नीला त्रास देत होता. काल रात्री देखील त्याने पत्नी बरोबर भांडण काढले. दारू पिण्यासाठी पैसे दे अशी मागणी तो करत होता. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने पत्नीच्या पोटात कात्रीने चार वेळा भोसकले.

त्यामुळे ती आरडाओरड रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. मंगळवार (ता.२६) मध्यरात्री २.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे शेजारील नागरिकांनी यल्लव्वाला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पती सिद्धाप्पा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com