सरकार स्थिर; मातोश्रीवर जाण्याचा प्रश्‍नच नाही - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

कोल्हापूर - राज्यातील सरकार स्थिर असल्याने पुन्हा मातोश्रीवर जाण्याचा काही प्रश्‍नच नाही. मध्यावधी निवडणुकीची नुसतीच चर्चा आहे. दोनशे आमदारांचे संख्याबळ असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचे काहीच कारण नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेनेतील वाढलेल्या धुसफुसीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार गुढीपाडव्याला मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा होती. या चर्चेला श्री. पाटील यांनी आज पूर्णविराम दिला. कोल्हापूर प्रेस क्‍लबच्या कार्यालय उद्‌घाटनानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

भाजपमध्ये प्रवेशासाठी अनेकांची नावे सध्या पुढे येत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचेही नाव चर्चेत आहे. याबाबत बोलताना श्री. पाटील म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवून पक्षात येणाऱ्यांचे नक्कीच स्वागत आहे. राणे सर्वच पक्षांना हवे असलेले व्यक्तिमत्त्व आहे. मात्र, अद्याप याबाबत काही चर्चा नाही. तसे झाल्यास हा विषय प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक पातळीवर चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय होईल.'' 

Web Title: Stable government - patil